पिंपरी: गाडीची हेडलाईट सुतळी बॉम्ब लावून फोडल्याने वाद होऊन एका सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार पवन विष्णु लष्करे याचा खून करण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून केला आहे आसे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी लष्करेने आरोपी सोन्या जाधवच्या दुचाकीची हेडलाईट सुतळी बॉम्ब लावून फोडली होती. तसेच दुसरा गुन्हेगार अक्षय काळे याला देखील मारहाण केली होती. याच कारणावरून सराईत गुन्हेगार सोन्या जाधव, अक्षय काळे यांच्यासह आठ जणांच्या टोळक्याने पवन विष्णू लष्करेचा याचा कोयत्याने वार करून खून केला असल्याची माहिती समोर येत आहे. अगोदर असलेल्या भांडणाचा देखील वचपा काढला आसल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. वाचा- अक्षय काळे, हर्षल परशुराम जाधव, सोन्या परशुराम जाधव, गणेश शिंदे, साहिल मस्के, राजू दोडमाणे यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लष्करे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड हद्दीत पुन्हा गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे पहायला मिळत आहे. वाचा- .. भोसरी एमआयाडीसी परिसरात ही घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत गुन्ह्याचा तपास वेगाने केला असून चार जणांना देखील ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/beG7XIi
No comments:
Post a Comment