Breaking

Tuesday, October 25, 2022

परतीच्या पावसानं नाडलेल्या शेतकऱ्याला १०० रुपयात शिधा, भास्कर जाधवांची शिंदे सरकारवर टीका https://ift.tt/zX6MnwV

रत्नागिरी : महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची धुळधान उडवलेली आहे. शेतकऱ्यांचं पीक शेतात कुजून जात आहे. अतिवृष्टी, परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानानं शेतकरी नाडला गेला आहे, असे असताना शंभर रुपयात या सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ शेतकऱ्याची गरिबांची केलेली चेष्टा असल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या दु:खावर डागणी दिली आहे. काही मंत्री स्वत: आनंदाचा शिधा वाटप करत होते. ते माझ्या मतदारसंघात १ लाख रेशन कार्ड असल्याचं म्हणत होते. एक लाख रेशनिंग कार्ड असणं आश्चर्यकारक असल्याचं वाटतंय असं भास्कर जाधव म्हणाले. हा शिधा सकाळी सातपर्यंत वाटला जाईल असं एक मंत्री करत होता, ही केवळ चेष्टा आहे , अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. आनंदाचा शिधा पाकिटावर स्वतःचे फोटो देखील छापले आहेत. शेतकरी दुःखात असताना त्यांच्या जखमेवर या सरकारने दिलेली ही डागणी आहे. परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काही लोकांचं पिक वाचलं असेल, पण पाण्यामुळे ते कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाजा केला. ते आपली पाठ आपणच थोपटून घेत आहेत, आनंदाचा शिधावर स्वत:चे फोटो छापल्यावरुन देखील भास्कर जाधवांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला. १०० रुपयांत दिवाळी साजरी होते का? यामुळे शेतकरी दुखावला गेला आहे. १०० रुपयांची दिवाळी भेट देऊन त्यांच्या जखमेवर डागणीच दिली आहे. तर काही मंत्री स्वतः शिधा वाटप करत होते. पण, शिधा वाटप हे दिवाळी सण करणाऱ्यांची कुचेष्टाच आहे,अशी बोचरी टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या आनंदाचा शिधा योजनेतील त्रुटी वारंवार दिसून येत आहेत. धुळे शहरात नागरिकांना १०० रुपयात केवळ तीन वस्तू दिल्या जात होत्या. त्यामुळं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wGR2N0e

No comments:

Post a Comment