Breaking

Thursday, October 20, 2022

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 'जिहाद' सांगितला; माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे वक्तव्य, पाहा व्हिडिओ https://ift.tt/8HTOQPK

नवी दिल्ली : हा केवळ कुराण शरीफमध्येच नाही, भगवान श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद सांगितला, असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी केले आहे. पाटील दिल्लीत आयोजित एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. पाटील यांच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात टीकेचा सूर उमटू लागला आहे. ( has stated that lord krishna taught arjuna ) दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवराज पाटील म्हणाले की, फक्त कुराण शरीफ बायबलमध्येच जिहाद नाही. तर श्रीकृष्णानेही अर्जुनाला जिहाद सांगितला आहे. महाभारतात गीतेचा समावेश आहे. याच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद सांगितला. इथे सांगितले जाते की, इस्लाम धर्मात जिहादची चर्चा खूप करण्यात आलेली आहे. आता आम्ही जे सर्वकाही संसदेत काम करत आहोत, ते जिहादशी संबंधित काम करत नाही आहोत. तर विचारांवर आधारित काम करत आहोत. जिहादचा मुद्दा केव्हा येतो?... जिहादचा मुद्दा तेव्हा येतो, जेव्हा मनात स्वच्छ विचार असताना देखील त्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करून देखील कोणी ते करत नाही किंवा तो ते समजत नाही, त्यावेळी म्हटले जाते की तुम्हाला जर शक्तीचा वापर करायचा असेल तर तो केला पाहिजे. आणि ते फक्त कुराण शरीफमध्ये नाही आहे. तर ते महाभारतात जी गीता आहे, त्या गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला जिहाद सांगतात. शिवराज पाटील पुढे म्हणाले की, आणि हा जो विषय आहे तो फक्त कुराण शरीफमध्ये आणि गीतेमध्ये आहे असे नाही, तर ख्रिश्चन लोकांनी देखील लिहिलेले आहे. सर्व समजावण्याचा प्रयत्न केला गेल्यानंतर देखील समजून घेतले जात नसेल, तर तो हत्यार घेऊन येत असेल तर तुम्ही पळून जाऊ शकत नाही. त्याला तुम्ही जिहादही म्हणू शकत नाही आणि ते चुकीचे आहे असेही म्हणून शकत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W29p6h7

No comments:

Post a Comment