इंदूर : भारताला तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण भारताने हा सामना का गमावला, याचे कारणही आता समोर आले आहे. कारण भारताच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट नेमका काय होता, हे आता समोर आले आहे. इंदूरचे स्टेडियम हे फलंदाजीसाठी पोषक समजले जाते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी हे दाखवून दिले. पण भारताच्या फलंदाजांनी मात्र सुरुवातीला हाराकिरी केली. रोहित शर्मा यावेळी दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर संघात पुनरागमन करणारा श्रेयस अय्यरही लवकर बाद झाला. यावेळी रिषभ पंतकडे सिद्ध करण्याची चांगली संधी होती, पण त्याने ती गमावली. सूर्यकुमार यादवही यावेळी अपयशी ठरला. दिनेश कार्तिकने यावेळी दमदार फलंदाजी केली आणि गोलंदाजीवर प्रहार केला खरा. पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण भारतीय फलंदाजांकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान यावेळी कार्तिकने पटकावला. कार्तिकने यावेळी २१ चेंडूंत ४ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली. दिनेश यावेळी भन्नाच फॉर्मात होता. त्यामुळे दिनेश यावेळी भारताला सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण कार्तिक यावेळी ४६ धावांवर बाद झाला आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटल्याचे पाहायला मिळाले. कारण दिनेश चांगल्या फॉर्मात होता आणि तो संघाला सामना जिंकवून देऊ शकत होता. पण तो बाद झाला आणि त्यानंतर भारताच्या हातून सामना निसटला. मोहम्मद सिराजकडूनही घडील मोठी चूकमोहम्मद सिराजने आजच्या सामन्यात पुनरागमन केले खरे, पण संघात आल्यावर सिराजकडून एख मोठी चूक घडली आणि त्याचा मोठा फटका यावेळई भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट घडली ती ९व्या षटकात. त्यावेळी आर. अश्विन हा गोलंदाजी करत होता. या षटकाच्या सहाव्या चेंडूवर सिराजकडून मोठी चूक घडली. अश्विनच्या गोलंदाजीवर यावेळी रिली रोसूने मोठा फटका मारला. हा फटका सीमाकेषेवर गेला आणि तिथे सिराज फिल्डिंग करत होता. हा चेंडू आता सिराजच्या हातात विसावणार, असे वाटत होते. चेंडू यावेळी सिराजच्या हाताला लागलाही, पण सिराजला यावेळी झेल पकडता आला नाही. रोसू यावेळी बाद झाला नाही. पण त्याचबरोबर हा चेंडू थेट सीमारेषे़पार गेला आणि रोसूला षटकार मिळाला. त्यामुळे सिराजच्या चुकीचे दोन मोठे फटके भारतीय संघाला यावेळी बसले. यावेळी रोसू हा २६ धावंवर खेळत होता. त्यानंतर रोसूने नाबाद शतक झळकावले आणि मोठी धावसंख्या उभारली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uWrQobe
No comments:
Post a Comment