इंदूर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना आज (४ सप्टेंबर) खेळवला गेला. या सामन्यात भारताला ४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी तर निवडली, मात्र भारताचे गोलंदाज आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखू शकले नाहीत. आफ्रिकेच्या प्रत्येक फलंदाजाने उत्कृष्ट खेळी करत भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दिसले. डीकॉकने अर्धशतक तर रीली रोसूने दणदणीत शतकपूर्ती केली. पण याच सामन्याच्या १६ व्या षटकादरम्यान एक विवादीत किस्सा घडता घडता राहिला. या सामन्याचे १६ वे षटक टाकत होता. दीपक चाहर या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून समोर आला आहे. दुसर्या सामन्यात भारताच्या सर्वच गोलंदाजांना जोरदार धुतले होते. परंतु तेव्हा ही सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज हा दीपक चाहर होता. आजच्या सामन्यात त्याने गोलंदाजीसहित उत्कृष्ट फलंदाजीही केली. आजच्या सामन्यात त्याला एकच विकेट मिळवता आली पण त्याच्या स्पोर्ट्समन स्पिरीटने सर्वांची मने जिंकली. या सामन्यात मँकडिंगचे नाटक पुन्हा एकदा पाहायला मिळाले. सामन्यातील डावाच्या १६व्या षटकात दीपक चहर गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी धावांसाठी धावला पण चहरने त्याला बाद केले नाही. यादरम्यान भारतीय संघाच्या या गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सला करत धावबाद करण्याची संधी होती परंतु त्याने चेतावणी दिली पण तसे केले नाही. हा प्रसंग अवघ्या काही सेकंदातच घडला आणि पुन्हा एकदा फलंदाज आणि गोलंदाज आपापल्या ठिकाणी गेले परंतु ही घटना पाहिल्यानंतर दीप्ती शर्माचा चार्ली डीनसोबतचा वाद मनात ताजा झाला. या सामन्यात दीपक चहरने भारतासाठी चार षटकात गोलंदाजीत ४८ धावा दिल्या. दुसरीकडे, ट्रिस्टन स्टब्सला जीवदानाचा फायदा घेता आला नाही आणि त्याला १८ चेंडूत केवळ २३ धावा करता आल्या. रिले रोसूने शतक ठोकले दक्षिण आफ्रिकेकडून भारताविरुद्धच्या या सामन्यात रिले रोसूने शानदार शतक झळकावले. रोसूचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. त्याने ४८ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या दमदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात २२७ धावा केल्या. रिले रोसूशिवाय क्विंटन डी कॉकनेही दक्षिण आफ्रिकेकडून अर्धशतक झळकावले. डी कॉकने ४३ चेंडूत ६८ धावा केल्या. संघाचा कर्णधार तेम्बा बावुमा याने पुन्हा एकदा निराश केले तर अखेरीस डेव्हिड मिलरने ५ चेंडूत १९ धावांचे उत्कृष्ट योगदान दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZT8b7JS
No comments:
Post a Comment