Breaking

Wednesday, October 19, 2022

अलिबागमधील आरसीएफ कंपनीत भीषण स्फोट, तिघांचा मृत्यू; स्फोटाचे कारण अस्पष्ट https://ift.tt/hr8MpgG

: रायगड जिल्हयातील अलिबागमधील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी झाल्याने झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एरिझो ग्लोबल या ठेकेदाराला एसी सप्लायचे काम आरसीएफ कडून देण्यात आले होते. नवीन एसी युनीटमध्ये एसी इन्स्टॉलेशनचे काम सुरू असताना हा स्फोट झाला आहे. त्यात ६ कर्मचारी गंभीर जखमी झाले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान कारणाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आरसीएफ जनसंपर्क विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. () दरम्यान सात जखमींपैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सहा कामगार ठेकेदाराचे आहेत तर एक ट्रेनी इंजीनिअर आरसीएफचा असल्याचाही माहिती मिळाली आहे. मात्र मृत्यूंबाबत कंपनी कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान रात्री उशिरा आरसीएफकडून याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या थळ कारखान्यातील बाष्पनिर्मिती संयंत्रामधील नियंत्रण कक्षाच्या एसी सप्लाय आणि इंस्टॉलेशनच्या कामाचा ठेका मेसर्स एरीझो ग्लोबल या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी नवीन एसी युनिटचे इंस्टॉलेशनचे काम करीत असताना स्फोट झाला. या स्फोटात ठेकेदार कंपनीचे पाच आणि आरसीएफचा एक कर्मचारी जखमी झाले. जखमींना त्वरित आरसीएफ हॉस्पिटल कुरुळ वसाहत येथे हलविण्यात आले. फैजन शेख (वय ३२ वर्षे), दिलशाद इदरिसी (वय २९ वर्षे) हे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तर अंकित शर्मा (वय २७ वर्षे) हे आरसीएफ प्रशिक्षणार्थी यांना मृत घोषित करण्यात आले. तर साजिद सिद्दिकी, जितेंद्र शेळके आणि अतींदर या ठेकेदार कंपनीचे कर्मचार्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. स्फोटाचे निश्चित कारण समजू शकले नाही. या संदर्भात चौकशी सुरू आहे. ही माहिती आरसीएफच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/f9IwcAS

No comments:

Post a Comment