: एका पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची घटना पालघर शहरात उघड आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन तासात चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले आहे. (a 5 year old girl was kidnapped in ) पालघर शहरातील विष्णूनगर येथील वर्धमानसृष्टी या गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या एका पाच वर्षीय चिमुकलीला तिचा दूरचा नातेवाईक असलेल्या सनी कांबळे या तरुणाने घरातून दुपारी तीन वाजताच्या सुमारास फिरवण्याच्या व खाऊ देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले. मात्र खूप वेळ झाला तरीही आपली मुलगी घरी आली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी, नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्यातच अपहरणकर्त्या सनी कांबळे याने चिमुकलीच्या वडिलांना फोन करत त्यांच्याकडून चिमुकलेला सुखरूप परत करण्यासाठी एक लाखाहून अधिक पैशाच्या खंडणीची मागणी केली. क्लिक करा आणि वाचा- आपल्या चिमुकलीचे झाल्याचे समजल्यानंतर मुलीच्या आईने व नातेवाईकांनी धाव घेत पालघर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर ताबडतोब तपासचक्र फिरवत उपविभागीय अधिकारी नीता पाडवी, पालघरचे पोलीस ठाणे अधिकारी उमेश पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून चिमुकलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अपहरणकर्ता कुटुंबीयांना फोन करताना आपले ठिकाण वारंवार बदलत होता. क्लिक करा आणि वाचा- मिळालेल्या माहितीच्या आधारे व आपली तपास चक्रे फिरवून या अपहरणकर्त्याला केळवे येथून चिमुकलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहरणकर्त्याला पालघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- चिमुकलीच्या अपहरणकर्त्याला पकडण्यात व तिच्या शोधकार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे, पोलीस कर्मचारी रमेश पालवे, भगवान आव्हाड, सागर राऊत, कल्पेश पाटील यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YEv8TRB
No comments:
Post a Comment