मुंबई : टी-२० विश्वचषकात भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचणार की नाही, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोणते चार देश पोहोचतील, यावर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेबाबत एक मोठे भाकित केले आहे. यामध्ये शास्त्री यांनी चार संघांची नावं घेतली आहेत. रवी शास्त्री यांनी यावेळी सांगितले की, " यावर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी चार संघ चांगल्या फॉर्मात दिसत आहेत. त्यामुळे ते विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. माझ्यामते विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघा पोहोचतील. पण या स्पर्धेत श्रीलंका आणि न्यूझीलंड हे ंसंघ डार्क हॉर्सही ठरू शकतात. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात चांगलीच चुरस पाहायला मिळेल." दक्षिण आफ्रिकेत २००७ साली झालेल्या विश्वचषकात भारताने विजेतेपद पटकावले होते, परंतु त्यानंतर या संघाने विश्वचषकात फारशी कामगिरी केलेली नाही. परंतु अलीकडेच सूर्यकुमार यादवचा उदय आणि मधल्या फळीत अनुभवी फिनिशर दिनेश कार्तिकचे पुनरागमन यामुळे भारताची फलंदाजी लयीत असल्याचे दिसते. दुखापतीमुळे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती असूनही, शास्त्री यांना वाटते की भारतीय फलंदाज यावेळी संघाला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यास मदत करू शकतात. त्यामुळे भरातीय संघ आता यावेळी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय संघातील दुखापतींबाबत शास्त्री नेमकं काय म्हणाले, पाहा....रवी शास्त्री म्हणाले की, " विश्चषक काही दिवसांपूर्वीच असताना बुमरा आणि चहर हे दुखापतीनंतर फिट झाले होते. मला विचाराल तर विश्वचषकापूर्वी या खेळाडूंना खेळवणे योग्य होते. कारण जोपर्यंत खेळाडूंना खेळवले जात नाही तोपर्यंत त्यांचा फिटनेस समजत नाही. ते फिट आहेत की नाही यासाठी त्यांना खेळवायला पाहिजे होते. मला वाटतं की, माझ्यावेळी जेव्हा कपिल देव खेळायचे तेव्हा त्यांनी कधीही जास्त विश्रांती घेतली नाही. न्यूझीलंडचे महान क्रिकेटपटू आणि गोलंदाज सर रीचर्ड हॅडली हे न्यूझीलंडमध्ये खेळायचे आणि त्यानंतर इंग्लंडमध्येही कौंटी क्रिकेट खेळायला जायचे. मी त्यांना विचाराचो की, तुम्हाला दुखापत होणार नाही का. त्यावर हॅडली यांनी सांगितले की, जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत मला दुखापत होणार नाही. त्यामुळे विश्वचषकापूर्वी या दोघांनाही खेळवणं, योग्यच होतं."
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F2Aktnb
No comments:
Post a Comment