Breaking

Thursday, October 13, 2022

विश्वचषकात पाकिस्तानला हरवायचे असेल तर ही एक गोष्ट करा, गौतम गंभीरचा भारताला मोलाचा सल्ला https://ift.tt/uqNvLXP

नवी दिल्ली : 'पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना फक्त बचावावर भर न देता भारतीय फलंदाजांनी प्रतिहल्ला करत धावाही जमवाव्यात', अशा शब्दांत सुनावले आहे ते भारताचे माजी कसोटीपटू गौतम गंभीर यांनी. टी-२० वर्ल्ड कप तोंडावर आला असताना गंभीर यांनी हे भाष्य केले. टी-२० वर्ल्ड कपमध्ये २३ ऑक्टोबरला भारताची सलामी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्नला होईल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला आशिया कपवर पाणी सोडावे लागले होते, पण आता तो सावरला असून भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणेल, अशी भाकिते केली जात आहेत. 'शाहीन आफ्रिदीच्या माऱ्यापासून फक्त बचावच करायचा या विचाराने खेळूच नये. त्याच्या गोलंदाजीवर धावा करणेही महत्त्वाचे आहे; कारण ज्यावेळी फलंदाजाच्या मनात फक्त बचावाची, विकेट वाचविण्याची भावना येते तेव्हा धावा जमविण्याची बाजू मागे पडते. हे टी-२० क्रिकेट आहे याचे भान ठेवा, इथे विकेट वाचविण्याचा ध्यास उपयोगी पडत नाही', क्रीडा वाहिनीवरील विश्लेषणाच्या कार्यक्रमात गंभीर यांनी या मुद्यांकडे लक्ष वेधले. 'शाहीन आफ्रिदी हा आव्हानात्मक गोलंदाज हे मीदेखील जाणतो; पण भारताच्या फलंदाजांनी धावा जमविण्याचा ध्यास घ्यावा. संघाला सूस्थिती ठेवणे, फक्त फटकेबाजीचा मोह आवरून चेंडू नूर समजून घेत आक्रमण करावे', गंभीर नमूद करतात. गेल्या बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना रवी शास्त्री यांनी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे कौतुक केले होते. 'भारताला शाहीन आफ्रिदीचा फार त्रास होणा नाही, कारण अगदी तीन, चार क्रमांकावरही दर्जेदार फलंदाज आहेत. हे फलंदाज आफ्रिदीचा नेटाने सामना करू शकतात', असे गंभीर यांना वाटते. इरफान पठाणने नेमकं काय सांगितलं, पाहा... भारतीय संघातील गंभीरचा माजी सहकारी, वेगवान गोलंदाज इरफान पठाणच्या मते टीम इंडियाच्या फलंदाजांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊन्डवर (एमसीजी) हुशारीने फलंदाजी करावी. 'एमसीजीवर समोरील सीमारेषा खूप दूर नाही, पण इतर बाजूंच्या सीमारेषा खूप दूर आहेत. भारताने खासकरून फलंदाजीत हुशारीने खेळायला हवे. चौकार तडकावणे कठीण होत असेल तर 'गॅप' शोधून दुहेरी ऐवजी तिहेरी धाव घ्यावी. अन् एकेरीऐवजी दुहेरी धाव कशी घेता येतील याकडे लक्ष द्यावे. कारण धावून काढलेल्या धावा खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत', असे इरफानला वाटते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yIWTNsb

No comments:

Post a Comment