मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार यांनी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. मुख्यमंत्री दीड वर्षापासून हा फेरा सुरु झाला, असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांचा तो उठाव होता की ठराव, दीड वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होतं, का असे सवाल राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना केले आहेत. याचवेळी राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी तान्ह्या बाळाबद्दल बोलायला नको होतं, असं राजू पाटील म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यावर भाष्य करताना भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच ! असं राजू पाटील यांनी म्हटलं होतं. मनसेचे दुसरे नेते संदीप देशपांडे यांनी देखील दोन्ही मेळाव्यांवर टीका केली आहे. राजू पाटील यांचे थेट एकनाथ शिंदे यांना सवाल आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा संदर्भ देत काही सवाल उपस्थित केले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होतं का असा सवाल राजू पाटील यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उठाव की ठराव हे देखील त्यांनी सांगावं, असं राजू पाटील म्हणाले. ठाकरेंनी तसं बोलयला नको होतं राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांना देखील सुनावलं आहे. उद्धव ठाकरेंनी तान्ह्या बाळावर असं बोलयाल नको होतं, असं राजू पाटील म्हणाले. राज साहेब ते राजसाहेबचं भाषणासाठी कोणाला कोणावरचा 'राग' लागतो, अभ्यासपूर्ण बोलायला राजसाहेबांसारखा 'वाघ' लागतो. राजसाहेब ते राजसाहेबच आहेत, असं राजू पाटील म्हणाले. कालची दोन्ही भाषणं आम्ही पाहिलं, गर्दी आणि दर्दी राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात दिसते. सेनेच्या दोन गटामुळं मराठी माणूस गोंधळलेल्या स्थितीत आहेत, अशावेळी राज ठाकरेच त्यांना एकत्र आणू शकतात, असं राजू पाटील म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gSNHFO9
No comments:
Post a Comment