Breaking

Wednesday, October 12, 2022

अर्जुन तेंडुलकर अखेर लय सापडली, युवराज सिंगच्या वडिलांनी दिलेल्या प्रशिक्षणानंतर केली कमाल https://ift.tt/lYT0VCB

मुंबई : गेल्याकाही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला नेमकं काय करावं ते समजत नव्हंत. तो चांगल्या फॉर्मात नव्हता. मुंबईचा संघही त्याने सोडला होता. मुंबई इंडियन्समध्ये त्याला संधी मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम होता. पण त्यानंतर अर्जुनला युवराजचे वडिल योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला पाठवले आणि तो आता चांगल्या लयीत आल्याचे पाहायला मिळत आहे. अर्जुन तेंडुलकरने गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण केले होते. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या सामन्यात हरियाणाविरुद्ध ३ षटकांत ३४ धावा आणि दुसऱ्या सामन्यात पुद्दुचेरीविरुद्ध ४ षटकांत ३३ धावा दिल्या. त्यानंतर त्याला पुन्हा संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईत संधी मिळत नसल्याचे पाहून अर्जुन तेंडुलकर गोव्याकडे वळला. आता सय्यद मुश्ताल अली ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ मध्ये गोव्याचा पहिला सामना त्रिपुराविरुद्ध होता. या संघात ऋद्धिमान साहासारखे खेळाडू आहेत. अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही पण त्याने ३ षटकात केवळ २० धावा दिल्या. त्याने नव्या चेंडूने गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत आणले. आता बुधवारी गोव्याच्या संघाचा सामना मणिपूरशी झाला. या सामन्यात अर्जुनने पुन्हा एकदा ओपनिंग स्पेल टाकला. अर्जुनने आपल्या दुसऱ्याच षटकात दोन बळी घेतले. प्रथम अर्जुन तेंडुलकरने करणजीत युमनमीला बाद केले. दोन चेंडूंनंतर प्रफुल्लमणी सिंग अर्जुनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. चार षटकांच्या स्पेलमध्ये अर्जुनने अवघ्या २० धावांत २ बळी घेतले. त्यामुळे गोव्याच्या संघाने दोन्ही सामने जिंकले. योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेसय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपूर्वी अर्जुन तेंडुलकर योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षणासाठी गेला होता. गेल्या महिन्यात त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये अर्जुन योगराजकडून प्रशिक्षण घेत होता. अर्जुन ट्रेनिंगसाठी चंदीगडला पोहोचला होता. युवराज सिंगचे वडील योगराज खडूस प्रशिक्षक मानले जातात. आता त्याच्या प्रशिक्षणाचा परिणाम अर्जुनच्या खेळावरही दिसून येत आहे. अर्जुनचा गोव्याचा संघ आता हैदराबाद, पंजाब, यूपी आणि दिल्ली या संघांशीही भिडणार आहे. यामध्ये सर्वांच्या नजरा अर्जुनच्या कामगिरीवर असतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0wij4zE

No comments:

Post a Comment