Breaking

Wednesday, October 12, 2022

साई रिसॉर्ट पाडण्याची दसऱ्याची डेडलाइन हुकली, किरीट सोमय्यांकडून आता नवी अपडेट https://ift.tt/85BDi0w

रत्नागिरी: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी आर्थिक तरतूद झाल्यााची माहिती दिली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 1 लाख 25 हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली दिली आहे. रत्नागिरीचे माजी पालकमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्यांनी दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 1 कोटी 1 लाख 25 हजार रुपये जमा करण्यात आले असून मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला गेला तसंच साई रिसॉर्ट पाडलं जाईल असं सोमय्यांनी म्हटलं. किरीट सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या म्हाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील घोटाळयाचे स्मारक मुरुड येथील साई रिसॉर्ट दसऱ्यापर्यंत जमीनदोस्त होईल, असं म्हटलं होतं, मात्र, दसऱ्याची डेडलाईन उलटून गेली आहे. आता सोमय्यांनी अद्यापपर्यंत तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र आता निधीची तरतूद झाल्याने ही कारवाई येत्या काही दिवसात केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असं म्हटलं. सोमय्यांनी यावेळी सदानंद कदम यांनी चौकशीवेळी परब यांनी मला रिसॉर्ट विकले, असं लिहून दिल्याचा दावा केला. दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांचे आहे, असा आरोप सोमय्यांनी केला. वीज आणि कर लावण्यासाठी अनिल परब यांनीच अर्ज केला आहे, असा दावा सोमय्यांनी केला. परब यांच्यावर फौजदारी गुन्हा लवकरच दाखल होईल, यासाठी जास्तीचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत, असं सोमय्या म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zRl91Pb

No comments:

Post a Comment