Breaking

Monday, October 10, 2022

ही मशाल कट कारस्थान करणाऱ्यांविरोधात पेटत राहील, सुषमा अंधारेंचा विरोधकांना सूचक इशारा https://ift.tt/s0L9fqo

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावं दिलं आहे. तर, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम ही काफी है म्हणतं मशाल चिन्ह मिळालं याचा आनंद व्यक्त केला आहे. ही मशाल अन्याय, अत्याचाराविरोधात, जटिल राजकारणाविरोधात, कट कारस्थान करणाऱ्यांविरोधात पेटत राहील. ही मशाल गोरगरीबांच्या झोपड्यांमधील अंधार दूर करण्यासाठी, अन्यायाचे निवारण करण्यासाठी कायम धगधगत राहील, असं अंधारे म्हणाल्या. शिवसेनेचं नामोनिशाण मिटवू शकणार नाही मागच्या अडीच महिन्यापासून त्यांनी बालहट्ट चालवला आहे. उद्या मीच उद्धव ठाकरे आहे, असही ते म्हणू शकतात. अजून ते कसं म्हणाले नाहीत, ते कुठल्याही नावावर, कशावरही दावा करु शकतात. त्यांना खेळवलं जातय शिंदेपेक्षा मला भाजपावर बोलायला जास्त आवडेल” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. भाजपा जे राजकारण करु पहातेय. त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवायचं आहे. पण भाजपाच्या दहा पिढ्यांनाही हे शक्य होणार नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. ठाकरेंना मशाल चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. ठाकरेंनी आणि शिदेंनी त्रिशुळ आणि उगवता सूर्य चिन्ह मागितलं होतं. पण निवडणूक आयोगाने त्रिशुळ हे धार्मिक तर उगवता सूर्य हे द्रमुकचं चिन्ह असल्यानं त्या मागणीला नकार दिला. तर, शिंदे गटाचं गदा हे चिन्ह धार्मिक असल्यानं रद्द केलं. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्हासाठी पर्याय मागितले आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अंधेरीसाठी ठाकरेंना मशाल अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे 'शिवसेना' हे नाव व 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले होते. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी 'त्रिशूळ', 'उगवता सूर्य' आणि 'मशाल' या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. तर नव्या पक्ष नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' व 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही नावे नोंदणीसाठी दिली होती. त्यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगानं दिलं आहे. तर, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंना मशाल चिन्ह वापरावं लागेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r7jSkT2

No comments:

Post a Comment