Breaking

Thursday, October 27, 2022

चार प्रकल्प महाराष्ट्रातून निसटले, उद्योगमंत्री राजीनामा देणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल https://ift.tt/YKVzpTf

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, असा प्रहार राज्य सरकारवर केला आहे. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही , असंही ते म्हणाले. महाराष्ट्राला अजून धक्का, हजारोंची गुंतवणूक करणारा टाटा एयरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एयरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, असा प्रहार आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये उदय सामंत यांना हा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात टाटा एअरबस प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला आहे. टाटा एअरबस भारतात ४० विमानं बनवणार भारत सरकार आणि एअरबस यांच्यातील करारानुसार पहिली १६ विमानं पुढील चार वर्षात स्पेनमध्ये निर्मिती करण्यात आलेली भारतीय हवाई दलाला दिली जाणार आहेत. ४० विमानांची निर्मिती टाटा अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम्स यांच्या संयुक्त प्रकल्पात केली जाणार आहे. सी-२९५ च्या द एअरबस डिफेन्स अँड स्पेस क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमला भारतीय नियामक संस्था डीजीएक्यूएनं परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात मात्र एअरबसचा प्रकल्प न आल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rKjZxwp

No comments:

Post a Comment