सातारा : राज्यात येणाऱ्या मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मविआ आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांनतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी राज्यातील उद्योगाच्या मुद्यावर एकनाथ शिंदेंसोबत वादविवाद करण्यास तयार असल्याचं म्हटलं. तर, टाटा एअरबस प्रकल्पावर एकनाथ शिंदे यांनी बोलावं, असं आव्हान दिलं होतं. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी मला राजकारण करायचं नाही, असं म्हणत राजकीय वादावर भाष्य करणं टाळलं. देवेंद्र फडणवीस यांनी अगदी विस्तृतपणे भूमिका मांडली आहे. नवीन प्रकल्प आपल्याकडे येत आहेत. मी आणि ते सातत्यानं प्रयत्न करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याशी आमचा सातत्यानं संपर्क आहे. इतर विभागांचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबतदेखील राज्याच्या विकासासाठी आम्ही संपर्कात असतो. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले आहेत असे आरोप सुरु आहेत त्यावर मी काय बोलणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. राज्याची भरभराट, राज्याच्या तरुणाईला रोजगार, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम आमचं सरकार करेल. मला काय त्यांना उत्तर द्यायचं नाही. हे सर्वसामान्यांचं आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोरडा दिलासा देऊन चालत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातून उद्योगाचे प्रकल्प उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंचं सरकार असताना वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि सॅफ्रन या कंपन्याचे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी यासाठी विविध बातम्यांचे संदर्भ दिले. तर, आदित्य ठाकरेंनी देखील त्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fuKhHJ9
No comments:
Post a Comment