Breaking

Monday, November 21, 2022

वर्ल्ड कप स्पर्धेत खळबळजनक घटना, खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हटलंच नाही, नेमकं काय घडलं? https://ift.tt/aCW2KFt

कतार : फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामन्यापूर्वी खळबळ माजवणारी घटना घडली. इराणच्या संघानं सामन्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला. इराणच्या टीमनं देशात सुरु असलेल्या सरकार विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. इराणच्या सरकारनं देशात आंदोलक महिलांच्या वेशभूषेबाबत कठोर निर्बंध लागू केले आहेत. सरकारच्या निर्णयाविरोधात महिला आंदोलन करत आहेत. त्या महिलांना फुटबाल संघानं पाठिंबा दिला आहे. इराणचा कॅप्टनं अलीजा जहांबख्श यांनी आमची टीम एकत्रिपणे इराणमधील सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की नाही यांचा विचार करत होती. अखेर आम्ही इराणचं राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिल्याची माहिती अलीजा जहांबख्श यांनी दिली. त्यांनी इराणंचं राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला. दुसरीकडे इराणच्या टीव्हीद्वारे या व्हिडिओचं प्रक्षेपण कण्यास बंदी घताली आहे. इराणमध्ये महिलांवर लादण्यात आलेल्या सक्तीच्या वेशभूषेवरुन सामान्य महिलांनी आंदोलन सुरु केलं आहे. महिलांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. महसा अमिनी या उत्तर पश्चिमी इराणमधील शहर साकेज शहरातील कुर्द महिला होत्या. १६ सप्टेंबरला इराणच्या तेहरानमध्ये कोमात असताना तिचा मृत्यू झाला होता. तीन दिवस कोमात राहिल्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी अटक केली त्यावेळी महसा अमिनी तेहरानला आल्या होत्या. अमिनी हिनं नियमांचं पालन केलं नव्हतं असा दावा पोलिसांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमिनीवर ड्रेसकोड उल्लंघनाचा आरोप करण्यात आला होता. अमिनीनं हिजाब घातला नव्हता असाही आरोप करण्यात आला. एका अहवालाच्या माहितीनुसार पोलिसांनी अमिनीच्या डोक्यात मारहाण केली होती. अमिनीसोबत दुर्व्यवहार केले होते. मात्र, पोलिसांनी हे दावे फेटाळले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार अमिनीला ह्रदयविकाराचा धक्का बसला होता. तर , तिच्या वडिलांनी अमिनीची तब्येत चांगली असल्याचं म्हटलं होतं. साकेजमध्ये अमिनीच्या अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. त्यांनी हिजाबच्या मुद्यावरुन सरकार विरोधी घोषणा दिल्या होत्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/k49dTQN

No comments:

Post a Comment