मुंबई : विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाज नारायण जगदीशन याने धमाकेदार फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकली आहेत. या धडाकेबाज फलंदाजाने बीसीसीआयचे सचिव यांच्यावरही गारूड केले आहे.नारायण जगदीशने २७७ धावांची विक्रमी खेळी खेळून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तुफानी फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी खास अभिनंदन केले आहे. (bcci secretary congratulates n jagadeesan) जय शहा यांनी केले जगदीशनचे खास अभिनंदन एन जगदीशन यांच्यासंदर्भात जय शहा यांनी ट्विट करत हे खास अभिनंदन केले आहे. जय शहा आपल्या ट्विटमध्ये लिहितात 'सलग पाच शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनल्याबद्दल आणि लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जागतिक विक्रम मोडल्याबद्दल जगदीसनचे अभिनंदन. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.' क्लिक करा आणि वाचा- जगदीशनने केली २७७ धावांची विक्रमी खेळी २०२२ अंतर्गत अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या संघांमध्ये सामना रंगला. या सामन्यात सलामीवीर एन. जगदीसनने १४१ चेंडूत २५ चौकार आणि १५ षटकारांसह २७७ धावांची विक्रमी खेळी खेळली. लिस्ट ए मधील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. क्लिक करा आणि वाचा- तामिळनाडूने केला विक्रम तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २ गडी गमावून ५०६ धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना अरुणाचल प्रदेशचा संघ पत्त्यासारखा विखुरला. विशेष म्हणजे अवघ्या २८ षटकांत ७१ धावातच त्यांचे सर्व खेळाजू बाद झाले. तामिळनाडूने ४३५ धावांनी विक्रमी विजय नोंदवला. लिस्ट ए क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजयाचा विक्रम आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jenwyAU
No comments:
Post a Comment