: खाजगी कार्यालयामध्ये अनेकदा महिला सहकाऱ्यावर दबावाखाली प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न केल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत उघड झालेली आहेत. असे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. असे प्रकार अनेक चित्रपटांत देखील पहिला मिळतात. अशीच एक संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातल्या एका सीएने चक्क एका ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून, त्याचा विडिओ तयार केला. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून हा सीए तीन वर्षे तिच्यावर बलात्कार करत होता. हा प्रकार कोथरूड येथे घडला असून आरोपी सीएला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सीए भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्याकडे आधी काम करत होता अशी माहिती मिळत आहे. या सीएने पीडित महिलेवर सन २०१९ ते २०२२ या कालावधीत अत्याचार केले. याप्रकरणी या पीडित ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराचा आरोप असलेल्या सीएचे नाव अनिरुद्ध सतीश शेठ (४२) असे आहे. कोथरूड परिसरात त्याचे ऑफिस आहे. फिर्यादी महिला त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी करत होती. त्यामुळे दोघांची चांगली ओळख होती. क्लिक करा आणि वाचा- मार्च २०१९ मध्ये अनिरुद्ध शेठ यांनी फिर्यादी महिलेला क्लाइंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने भुगाव येथे नेले. भुगाव येथील फ्लॅटवर गेल्यानंतर आरोपीने केक पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध देऊन फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या सर्व घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीसोबत वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. मुंबई पुणे आणि अलिबाग येथील हॉटेलमध्ये आणि येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनीत वेळोवेळी हा प्रकार घडला. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध शेठ याने या महिलेसोबत पुन्हा जबरदस्ती करत याविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीला आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/R8vXF5s
No comments:
Post a Comment