Breaking

Sunday, November 27, 2022

पुराच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग; देशातील असा पहिला पाणीपुरवठा प्रकल्प बिहारमध्ये सुरू https://ift.tt/OplToYN

पाटणा : बिहार या राज्याने देशातील पहिलाच ठरेल असा पिण्याच्या पाण्याबाबतचा महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प कार्यान्वित करत मोठे पाऊल टाकले आहे. राजगीर, गया आणि बोधगया 'बुद्धीस्ट सर्किट' म्हणून ओळखल्या जाणार्‍या या लोकप्रिय पर्यटन स्थळांना २७ नोव्हेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून या प्रकल्पाची 'अमूल्य भेट' मिळाली. भारतातील अभिनव पेयजल प्रकल्प असलेल्या या गंगा जल पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि बिहारचे जलसंपदा मंत्री संजय कुमार झा, सीएच सुब्बय्या, प्रकल्प संचालक MEIL या कार्यक्रमात उपस्थित होते. जल जीवन हरियाली मिशन अंतर्गत सुरू झालेला हा प्रकल्प बिहारचा पहिला आणि सर्वात मोठा पेयजल प्रकल्प आहे. पावसाळ्यातल्या गंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा साठा, प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवून त्याचा पुरवठा करणे हे या योजनेचे उदिष्ट्य आहे. या योजनेचे दोन मोठे फायदे या प्रदेशाला मिळतील. पुराच्या पाण्यापासून संरक्षण तसेय त्या पाण्याचा अपव्यय टाळणे हा एक फायदा आणि या मौल्यवान स्त्रोताचे सुरक्षित, पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर केले जाणे हा दुसरा फायदा असणार आहे. क्लिक करा आणि वाचा- पुराचे पाणी हथिदाह येथील पंपांद्वारे उचलले जाईल आणि १५१ किलोमीटरच्या पाइपलाइनद्वारे राजगीर, तेतार आणि गया येथील तीन मोठ्या जलाशयांमध्ये नेले जाईल. जलाशय तेथील भौगोलिक परिस्थीतीचा अभ्यास करून आणि नैसर्गिक उपलब्धतेचा वापर करून बांधले गेले आहेत. जलाशयातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात (WTP) जाईल. जिथे त्यावर प्रक्रिया केली जाईल आणि शहरांना ते पाणी वितरीत केले जाईल. क्लिक करा आणि वाचा- राजगीर, गया आणि बोधगया या दक्षिण बिहारच्या तीन शहरांना बोअरवेलद्वारे भूजलाचा अतिरेक उपसा झाल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. Megha Engineering & Infrastructure Limited (MEIL) ने प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. एमईआयएल ने हा प्रकल्प कोविड-19 सारखी प्रतिकुल परिस्थिती असूनही तीन वर्षांत विक्रमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/7FDuAXs

No comments:

Post a Comment