: जगात असे काही जुने विक्रम आहेत जे आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. त्यापैकी थॉमस वेडर यांचा असा विक्रम आहे जो ३०० वर्षांनंतरही कोणी मोडू शकलेला नाही. थॉमस यांनी १८ व्या शतकात सर्वात लांब नाकाचा अनोखा विक्रम केला होता. त्याचे नाक ७.५ इंच किंवा १९ सेमी लांब होते. असे मानले जाते की त्याने संपूर्ण यॉर्कशायरमध्ये लोकांना त्याचे नाक दाखवण्यासाठी प्रवास केला होता. परंतु त्या वेळी थॉमस यांच्या विचित्र नाकाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा नव्हता. ( man was lived in 18th century still no one could break the record) थॉमस यांच्या ७.५ इंच लांब नाकासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या पुस्तकात नाव नोंदवले आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, '१७७० च्या दशकात इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आणि सर्कसमध्ये काम करणाऱ्या थॉमस वेडर्स यांचे नाक ७.५ इंच लांब असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.' दस्तऐवजांनुसार त्यांचा मृत्यू झालातेव्हाही त्यांचे नाक नेहमीसारखेच होते. एका मेणाच्या पुतळ्यावरून वेडर यांच्या नाकाच्या लांबीची कल्पना येऊ शकते. हा मेणाचा पुतळा संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. थॉमस वेडर्स यांचा हा मेणाचा पुतळा बिलीव्ह इट ऑर नॉट म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांचा जन्म त्याच शहरात झाला. अलीकडेच, वेडर्स यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातील त्यांचे लांब नाक पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले होते. एक Reddit वापरकर्ता म्हणाला, 'हे नक्की काय आहे? ट्यूमर? लांबी? अनुवांशिक दोष? मला अनेक प्रश्न आहेत.' हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही वेडर्स यांचा विक्रम त्याच्या शारीरिक स्वरूपाशी संबंधित होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. पण सध्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी लोक वेडेपणाची हद्द ओलांडतात. गेल्या वर्षी एका व्यक्तीने एका मिनिटात सर्वाधिक मिरच्या खाऊन नवा विक्रम केला होता. कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या ग्रेगरी फॉस्टरने ६० सेकंदात १७ मिरच्या खाऊन जुना रेकॉर्ड नष्ट केला नवा प्रस्थापित केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6vPT9g1
No comments:
Post a Comment