Breaking

Wednesday, November 16, 2022

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत कोणत्या मुद्यांवर चर्चा? प्रकाश आंबेडकरांनी सगळंच सांगितलं https://ift.tt/QBE0u1V

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या दादर येथील राजगृह निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे सांगितलं आहे. आज मुंबईत राजगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.भावना गवळी, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली. "राजगृहा"त जतन केलेल्या बाबासाहेबांच्या काही वस्तू त्यांना दाखवल्या. यावेळी इंदू मिल येथे प्रस्तावित स्मारकाबाबत त्यांनी चर्चा केली, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. २००३ ला संयुक्त राष्ट्रात (डरबन, द. आफ्रिका) सामाजिक अजेंड्यावर भारत सरकारला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या परिषदेला मी उपस्थित होतो. सामाजिक मुद्द्यांवर ती परिषद झाली होती. त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी याबद्दल माझ्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, भारताकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषण करणारी कोणतीही संस्था नाही. केवळ परराष्ट्र खातं आहे. त्यामुळे जगाची जी अपेक्षा होती ती सरकारपर्यंत पोहोचली नाही. अशा प्रकारची संस्था उभी राहत नाही तोपर्यंत भारत सरकारचा पराभव होत राहील असे मी त्यांना सांगितले होते. त्याचवेळी पंतप्रधान वाजपेयींनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभारावे व त्याचा संपूर्ण खर्च केंद्रसरकार करेल अशा आशयाची नोट तयार केली. त्या नोटची मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. काँग्रेस,भाजपच्या काळात आतापर्यंत हे शक्य झालेले नाही. आपल्या कार्यकाळात आपण त्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांना सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर यांना दिली. पुढील आठ दिवसात अहवाल सादर करायला सांगितला. इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभं राहिलं अशी अपेक्षा, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KdJF7MV

No comments:

Post a Comment