Breaking

Thursday, November 17, 2022

पालकांनो मुलांची काळजी घ्या! मुंबईत वेगाने पसरतेय गोवरची साथ, आतापर्यंत गोवरचे आठ बळी https://ift.tt/kePRcUw

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईसह राज्यामध्ये गोवरचा संसर्ग वाढत असून, आतापर्यंत आठजणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील आठ प्रभाग या आजाराच्या संसर्गाखाली आले असून, एम पूर्वमध्ये सर्वाधिक पाच ठिकाणी, तर एल प्रभागामध्ये तीन ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे. मुंबईत आतापर्यंत आठ संशयित गोवररुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सात एम पूर्व प्रभागातील, तर एक रुग्ण एल प्रभागातील आहे. यातील केवळ एका मुलाने गोवर प्रतिबंधक लस घेतली होती. दरम्यान, राज्यात सहा हजार ४२१ संशयित रुग्ण असून, ५०३ बालकांमध्ये गोवरचे निश्चित निदान झाले आहे. मुंबईतील गोवरस्थिती - एकूण संशयित रुग्ण : १,२५९ - निदान झालेले रुग्ण : १६४ - संशयित गोवर मृत्यू : ८ चार वर्षांतील राज्याची गोवर रुग्णस्थिती वर्ष संशयित निदान झालेले मृत्यू २०१९ १,३३७ १५३ ३ (मुंबई) २०२० २,१५० १९३ ३ (नागपूर, चंद्रपूर, अकोला मनपा) २०२१ ३,६६८ ९२ २ (ठाणे, मुंबई) २०२२ ६,४२१ ५०३ ८ (मुंबई) ही आहेत लक्षणे गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य असा आजार आहे. तो लसीकरणातून टाळता येऊ शकतो. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर व नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्णसंसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदूसंसर्ग अशी गुंतागूंत होऊ शकते. राज्यस्तरीय उपाययोजना - घरोघरी गोवररुग्ण सर्वेक्षण - लसीकरण राहिलेल्या बालकांसाठी अभियान स्वरूपात विशेष लसीकरण सत्रे - गोवर, रूबेला लसीची मात्रा चुकलेल्या नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची जिल्हा/मनपानिहाय यादी - या बालकांसाठी विशेष तसेच नियमित सत्रांमध्ये लसीकरण - संवेदनशील भागावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना - ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२२मध्ये राज्यात २,९७४ विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन 'लसीकरणावर भर द्या' मुंबई : महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्या. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणा. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गोवर नियंत्रणाबाबत आढावा बैठकीत दिल्या. लसीकरणाअभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथे तातडीने लसीकरणाची मोहीम पालिकेने हाती घ्यावी व साथ नियंत्रण आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी गोवरवर उपचार घेत असलेल्या मुलांची व त्यांच्या नातेवाईकांची गुरुवारी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sP8uixS

No comments:

Post a Comment