Breaking

Thursday, November 17, 2022

नोकरीसाठी प्रयत्न करणे जवानाला महागात; साडेआठ लाखाची फसवणूक https://ift.tt/vAcTxod

म. टा. खास प्रतिनिधी मुंबईः अर्ध वेळ (पार्ट टाइम) नोकरीचा प्रयत्न करणे नौदलामधील जवानाला चांगलेच महागात पडले आहे. नोकरीच्या मिळवण्याच्या नादात जवानाने सुमारे साडेआठ लाख गमावले आहेत. याप्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलाबा येथील आय. एन. एस. शिक्रा येथे वास्तव्यास असलेला जवान रविराज (बदललेले नाव) याला मोबाइलवर एक संदेश आला. यामध्ये पार्ट टाइम नोकरीबाबत माहिती देण्यात आली होती. रोज १५ ते २० मिनिटे ऑनलाइन काम करून १५ ते २० हजार रुपये कमावता येतील, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. आपल्या कामानंतर जो निवांत वेळ मिळतो त्यामध्ये हे काम करता येईल, असा विचार करून रविराज याने संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीला फोन केला. समोरील व्यक्तीने रविराज याला ‘शॉपिंग मॉल’ हा ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपवर वेगवेगळे टास्क पाठवून ते पूर्ण करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला केवळ ३०० रुपये भरून काही उत्पादने विकण्याचा टास्क देण्यात आला. हा टास्क पूर्ण केल्यानंतर ॲपवर त्याच्या खात्यामध्ये ३०० रुपये आणि कमिशन जमा झाले. त्यामुळे रविराज याचा यावर विश्वास बसला आणि फावल्या वेळेत तो पैसे गुंतवून टास्क पूर्ण करू लागला. सुमारे साडेआठ लाख रुपये गुंतविल्यानंतर पैसे काढण्यासाठी त्याने प्रतिनिधीशी संपर्क केला. मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अनेकदा संपर्क करूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे रविराज याच्या लक्षात आले. त्याने अनेक प्रयत्न केले मात्र गुंतवलेली रक्कम परत मिळत असल्याने रविराज याने कुलाबा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Akczoex

No comments:

Post a Comment