Breaking

Tuesday, November 1, 2022

धावत्या एसटी बसने घेतला पेट, बसचा झाला कोळसा; बसमधून प्रवास करत होते ३५ प्रवासी https://ift.tt/LxfAN25

: अकोला येथून नागपूरला निघालेल्या गणेशपेठ आगाराच्या धावत्या एसटी बसने पिंपळविहीरनजीक अचानक पेट घेतला. बघता बघता संपूर्ण बस पेटली आणि एसटी बसचा कोळसा झाला. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. या एसटी बसमध्ये चालक, वाहक यांच्यासह ३५ प्रवासी होते. मात्र, चालकाच्या सतर्कतेने सर्व बचावले. ( in amravati) गणेशपेठ आगराची अकोला नागपूर बस क्र. एम एच १४ बी टी ४४११ ही अकोला येथून नागपूरकडे जात असताना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान पिंपळविहिरनजीक आली. त्यावेळी एसटी बसच्या इंजिनातून धूर निघत असल्याने प्रसंगावधान साधून चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली आणि आधी सर्व प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. एसटीत असलेले सर्व प्रवासी तातडीने बसमधून खाली उतरले. तोपर्यंत बसच्या इंजिनाने पेट घेतला होता आणि बघता बघता क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. क्लिक करा आणि वाचा- चालकाने तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन,अग्निशमन दल यांना पाचारण केले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. महामार्गावर वाहनांची झालेली कोंडी पोलिसांनी सुरळीत केली. काही वेळात अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळीदाखल झाले व आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत एसटी वाहनाचा संपूर्ण कोळसा झाला होता. क्लिक करा आणि वाचा- विशेष म्हणजे चालकाने दाखविलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चालकाने प्रसंगावधान साधले नसते तर काही क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. यावेळी अनेकांनी चालकाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EtVSz2P

No comments:

Post a Comment