Breaking

Thursday, November 17, 2022

राष्ट्रवादीच्या मंचावर एकनाथ खडसे बोलायला लागले अन् कार्यकर्त्यानेच हिसकावला माईक, कारण.... https://ift.tt/RWtwXB6

जळगाव : जामनेर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती होती. मेळाव्यात एकनाथ खडसेंनी भाषण करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची नावे घेतली. यासाठी खडसे यांच्या हातात एक चिठ्ठीही होती. त्यानुसार ते मान्यवरांची नावे घेत होते. मात्र त्याचवेळी गर्दीतून अचानक एक कार्यकर्ता थेट उठला व त्याने बोलत असलेल्या एकनाथ खडसेंच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे व्यासपीठावर मोठा गोंधळ उडाला. व्यासपीठावर बसलेल्या एका पदाधिकाऱ्याने माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला पकडून बाजूला नेले. काही वेळ कोणालाच नेमकं काय होत आहे तेच कळलं नाही. यानंतर भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ खडसेंनी माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याला टोले लगावत चिमटे काढले. दरम्यान, माईक हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यास शांत करत बाजूला नेले जात असताना तो 'आम्ही एवढ्या लांबून आलो तरी आमचे नाव घेत नाहीत' असं बडबडत असल्याचे आढळून आले. त्यामुळे खडसेंनी व्यासपीठावर काही लोकांची नावे घेतली नसल्याने या कार्यकर्त्याने खडसेंच्या हातातून माईक हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SCcLhAF

No comments:

Post a Comment