नवी दिल्ली : भारताचा युवा वेगवान गोलंदाज फार कमी वेळात भारतासाठी मॅचविनर ठरला आहे. या गोष्टीची दखल आता आयसीसीनेही घेतली आहे. त्यामुळेच त्याच्या नावाची घोषणा आता आयसीसीने केली आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला अर्शदीपच्या नावाची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु झाली आहे. एक कॅच सोडल्यामुळे अर्शदीप ट्रोल झाला होता. पण त्यानंतर त्याने अशी काही नेत्रदीपक कामगिरी केली की, तो भारतासाठी मॅचविनर ठरत होता. भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य करत असताना त्याने सुरुवातीला बऱ्याच वेळी भारताला विकेट्स मिळवून दिले. त्यामुळे भारताला खासकरून टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली. फार कमी वेळात अर्शदीप हा आता भारताचा हुकमी गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत अर्शदीपने टी-२० विश्वचषकात अचूक आणि भेदक गोलंदाजी केली होती. त्यामुळे तो प्रकशझोतात आला होता. त्याची ही कामगिरी आयसीसीच्या नजरेतूनही सुटलेली नाही. कारण आता आयसीसीने अर्शदीपची दखल घेत त्याच्या नावाबाबत मोठी घोषणा केली आहे. अर्शदीप सिंगला इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांसाठी जानेवारीत मतदान सुरू होईल, असे आयसीसीने म्हटले आहे. अर्शदीपला आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पंजाबच्या या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८.१२ च्या सरासरीने ३३ बळी घेतले आहेत. अर्शदीप नवीन आणि जुन्या दोन्ही चेंडूंवर विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर अर्शदीपनेही भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. अर्शदीपने भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्शदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीत काही संस्मरणीय कामगिरी केली आहे, ज्यामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानविरुद्ध टी-२० विश्वचषक सामन्यातील प्रभावी कामगिरीचा समावेश आहे. अर्शदीपने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन्ही सलामीवीरांना वेगवान गोलंदाजीच्या जोरावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. अर्शदीप डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीकडे परतला आणि त्याने असिफ अलीलाही बाद केले व सामन्यात ३२ धावांत तीन बळी मिळवले होते. भारताकडून निवडण्यात आलेला अर्शदीप हा भारताचा एकमेव पुरुष खेळाडू ठरला आहे. महिला गटात दोन भारतीयआयसीसीने महिला गटातील इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयरसाठी ४ खेळाडूंना नामांकन दिले आहे. यामध्ये भारताच्या दोन वेगवान गोलंदाज रेणुका सिंगसह यास्तिका भाटियाचे नाव आहे. त्यांची स्पर्धा ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राउन आणि इंग्लंडची एलिस कॅप्सी यांच्याशी होईल. रेणुकाने वनडेमध्ये १८ आणि टी-२० सामन्यांमध्ये २२ विकेट घेतल्या आहेत. यास्तिक भाटियाने वनडेत ३७६ धावा केल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RKIq3u1
No comments:
Post a Comment