: पुण्यातील दौंड स्थानकावरून थेट सोलापूर स्थानकाकडे निघाली होती. मध्ये कुठेच थांबा नसलेल्या राजकोट एक्सप्रेसला स्थानकावर अचानकपणे थांबा देण्यात आला होता. इतर प्रवाशांना मेडिकल इमर्जन्सी आहे असे सांगितले गेले. याचे कारण म्हणजे एका महिला प्रवाशाला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी कुर्डवाडी रेल्वे स्थानकावर राजकोट एक्सप्रेस थांबवून महिला प्रवाशाला वेळेत खाली उतरवले व कुर्डुवाडी रुग्णालयात दाखल केले. रजनीदेवी महंतो (२४) असे या महिला प्रवाशाचे नाव आहे. रजनीदेवी यांना वेळेत खाली उतरवून उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिला प्रवाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बुधवारी रात्री झाली प्रसूती; गोंडस मुलीचा जन्म रजनीदेवी महंतो या हैदराबादमधील गौतम नगर येथील रहिवासी आहेत. बुधवारी रात्री सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस पुण्याहून निघाली. रजनीदेवी महंतो या आपल्या पतीसोबत हैदराबाद/सिकंदराबाद कडे निघाल्या होत्या. रात्री पावणे अकराच्या सुमारास दौंड स्थानकावरून सुटलेल्या या राजकोट एक्सप्रेसमध्ये रजनीदेवी यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. क्लिक करा आणि वाचा- वेदना असह्य होत असल्याने रजनीदेवी यांच्या पतीने लोहमार्ग पोलीस एम. टी. माने, प्रकाश जिराळ, विकास भोसले यांनी ताबडतोब कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रमुखांना याबाबतची माहिती दिली व राजकोट एक्सप्रेस कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर थांबवली. रजनीदेवी महंतो यांना २७ डिसेंबर रोजी रात्री कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळातच रजनीदेवी यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. क्लिक करा आणि वाचा- रजनीदेवी महंतो यांचे पती सुनीलकुमार यांनी कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. वेळेत एक्सप्रेस गाडीला थांबा देत आपल्या पत्नीचे व बाळाचे प्राण वाचवले यासाठी त्यांनी सर्वांची कृतज्ञाता व्यक्त केली. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TmKwl3e
No comments:
Post a Comment