Breaking

Tuesday, December 20, 2022

फडणवीसांना बालेकिल्ल्यातच धक्का; दत्तक घेतलेल्या गावात काँग्रेस-राकाँ आघाडीची दुसऱ्यांदा सत्ता https://ift.tt/18fN9Pt

: माजी मुख्यमंत्री व विद्यमान यांचे दत्तक ग्राम फेटरीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. थेट सरपंच निवडणुकीत आघाडीचे रवींद्र खांबलकर हे विजयी झाले. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस-राकाँ समर्थित फेटरी विकास आघाडी पॅनलचे पाच सदस्य निवडून आले. सरपंच पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. परंतु, मुख्य लढत काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार रवींद्र खांबलकर आणि भाजपाचे सुरेश लंगडे यांच्यात झाली. रवींद्र खांबलकर यांना ६५७, तर भाजपचे सुरेश लंगडे यांना ५९२ मते मिळाली. यावरून खांबलकर हे ६५ मतांच्या अंतराने निवडून आल्याचे स्पष्ट झाले. क्लिक करा आणि वाचा- भाजपा समर्थित ग्रामविकास पॅनलचे वार्ड क्र. १ मधून तीन तर वार्ड क्र. २ मधून एक असे चार उमेदवार निवडून आले. काँग्रेस-राकाँ आघाडीचे वार्ड क्र. २ मध्ये दोन तर, वार्ड क्र. ३ मधील तीनही असे एकूण पाच उमेदवार विजयी झाले. आशीष गणोरकर, ज्योती राऊत, हर्षा लंगडे, वकील डोंगरे, जितेंद्र पवार, वैशाली लंगडे, मुकेश ढोमणे, रेखा ढोणे, आणि मृणाली दोडेवार या नऊ उमेदवारांनी बाजी मारली. आशीष गणोरकर यांना ३२४ मते मिळाली आहेत. तर, ज्योती राऊत यांना २३८ मते मिळाली. तसेच हर्षा लंगडे यांना २२५ मते, वकील डोंगरे यांना २०८ मते, जितेंद्र पवार यांना २१५ मते, वैशाली लंगडे यांना २२८ मते, मुकेश ढोमणे यांना २८४ मते, तर रेखा ढोणे यांना ३५१ आणि मृणाली दोडेवार यांना ४२५ मते मिळाली. क्लिक करा आणि वाचा- गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीच्या धनश्री ढोमणे यांनी भाजपाच्या ज्योति राऊत यांचा ११० मतांनी पराभव करून सरपंचपद खेचून आणले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zDtuP4

No comments:

Post a Comment