छतरपूर: मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला डांबून ठेवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मध्य प्रदेश पोलीस दलाकडून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला देखील अटक केली आहे. पीडित महिलेनं एका मैत्रिणीला तिच्या बहिणीच्या आजारपणात उपचारासाठी तीन लाख रुपये दिले होते. मात्र, ती रक्कम परत मागण्यासाठी महिला मैत्रिणीकडे गेली तेव्हा तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेनं यासंबंधी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार केली आहे. पीडित महिलेनं तिची मैत्रिण सोनाली रैकवार हिला बहिणीच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी तीन लाख रुपये दिले होते. पीडित महिला ही रक्कम परत मागण्यासाठी गेली असता सोनाली रैकवारनं तिला घरात बोलावून बांधून ठेवलं. तिथं पहिल्यापासून पंकज जैन, विजय नायक आणि गोपाल रैकवार आणि नीरज रैकवार होते. या चार जणांनी तब्बल ६ दिवस त्या महिलेवर बलात्कार केला. महिलेनं तिथून सुटून आल्यानंतर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. ओरछा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या जबाबाच्या आधारावर ओरछा पोलिसांनी चार पुरुष आरोपींना आणि एका महिलेला अटक केली आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. छतरपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी या प्रकरणी गंभीरपणे तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असल्याचं ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C0tDpIH
No comments:
Post a Comment