Breaking

Tuesday, December 27, 2022

लिलावात ५.५० कोटी मिळाले व आता भारतीय संघात स्थान, पाहा कोण आहे मुकेश कुमार https://ift.tt/c2Puogl

नवी दिल्ली : नेट बॉलर म्हणून त्याला प्रथम संधी मिळाली होती, त्यानंतर या लिलावात त्यालातब्बल पाच कोटी ५० लाख रुपये मिळाले. पण खरी लॉटरी तर त्याला आता लागली आहे. कारण आता त्याला भारताच्या संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आता मुकेश कुमार हा चांगलाच चर्चेत आला आहे. आयपीएलसाठी होतकरू खेळाडूंना नेटमध्य गोलंदाजी करण्यासाठी निवडले जाते. त्यासाठी मुकेश कुमारची निवड करण्यात आली होती. पण मुकेश हा फक्त नेट बॉलर असला तरी त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला चांगलेच प्रभावित केले होते. कारण नेट्समध्ये आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीने त्याने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याचा गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या यशामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होम वनडे मालिकेसाठी भारताचा पहिला कॉलअप मिळाला. जरी मुकेश एकदिवसीय मालिकेत खेळला नसला तरीही देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या प्रभावी धावांमुळे त्याने आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले. दिलीच्या संघा व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज देखील त्याला खरेदी करण्यास इच्छुक होते. चेन्नई आणि पंजाबच्या संघांनेही त्याच्यावर बोली लावली होती. पण दिल्लीने त्याला संघात घेण्यासाठी हट्टच केला आणि अखेर त्याच्यासाठी ५.५० कोटी रुपये त्यांनी मोजले. आयपीएलमध्ये दमदार बोली लागल्यावर आता मुकेशला चांगलीच लॉटरी लागली आहे. कारण आता भारताच्या टी-२० संघात त्याला संधी मिळाली आहे. बीसीसीआय आगामी टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून आपला संघ बांधत आहे. अजून विश्वचषकाला बराच कालावधी आहे. त्यामुळे आता संघ बांधण्यासाठी संघात बरेच प्रयोग केले जाऊ शकतात. त्यामुळे आता या टी-२० मालिकेत मुकेशला संधी मिळेल, असे म्हटले जात आहे. श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PQDTHkt

No comments:

Post a Comment