Breaking

Tuesday, December 20, 2022

पतीने पत्नीला चालत्या रिक्षातून दिले ढकलून, पुढे केले ते आणखी धक्कादाक; कारण वाचून येईल सतांप https://ift.tt/IP3MhOc

ठाणे : नशा करण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून रिक्षाचालक पतीने आपल्याच पत्नीला चालू रिक्षातून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पती एवढ्यावरच न थांबता त्याने पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी घरी आणले आणि तिला रॉडच्या सहाय्याने पुन्हा दोन वेळा मारहाण केली. सध्या महिलेच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या कृष्णानंद सिंग उर्फ हॅप्पी या रिक्षाचालकाने आपल्या पत्नीकडे नशा करण्यासाठी पैशाची मागणी केली. महिलेने आपला पगार झाला नसल्याचे पतीला सांगितले. एवढे ऐकून नशेखोर पतीने पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि फरफटत बाहेर काढले. पत्नीला जबरदस्ती रिक्षात बसवून पती रागात तेथून निघाला आणि पुढे हायवेला आल्यानंतर त्याने आपल्याच पत्नीला चालत्या रिक्षातून ढकलून दिले. यात महिला जखमी झाली. जखमी झालेल्या आपल्या पत्नीला या कृष्णानंदने रुग्णालयात न घेऊन जाता घरी आणले आणि लोखंडी सळईच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार १७ डिसेंबर रोजी घडला. यात पत्नी जखमी झाल्यानंतर तिला सासरच्या लोकांनी कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात बसमधून पडून जखमी झाल्याचा बहाणा सांगत उपचारासाठी भरती केले. दुसऱ्या दिवशी कृष्णानंद याने आपल्या पत्नीला पुन्हा रुग्णालयातून घरी आणले आणि पुन्हा तिला लोखंडी सळईच्या सहाय्याने बेदम मारहाण केली. पत्नीला वेदना असहाय्य झाल्याने तिने शौचालयाचा बहाणा करून जखमी अवस्थेत पळ काढला आणि आपल्या बहिणीला भेटून आपबिती संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. बहिणीला हा संपूर्ण प्रकार कळल्यानंतर बहिणीने पीडितेला ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ८ वर्षांपूर्वी पीडित महिलेचे रिक्षाचालक कृष्णानंद सिंग याच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना एक लहान मुलगा देखील आहे. मात्र कृष्णानंद हा सुरुवातीपासूनच नशेच्या आहारी गेला आहे. लग्न झाल्यापासून म्हणजेच गेल्या ८ वर्षांपासून नशेसाठी आपल्या पीडितेला तिचा पती अशाच प्रकारे मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे पीडितेच्या बहिणीने सांगितले आहे. तसेच आता देखील तो रुग्णालयात येऊन या महिलेला मारहाण करणार असल्याची धमकी देत असल्याचे देखील पीडितेच्या महिलेने सांगितले. सध्या या प्रकरणी ठाण्यातील वागळे पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा जबाब नोंद करण्यात आला. पोलीस पिडीत महिला आणि तिच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p6hnow1

No comments:

Post a Comment