Breaking

Thursday, December 1, 2022

डॉक्टरला आला राग, कारण होते शुल्लक; क्लिनिकमधली लोखंडी सळई उचलली आणि थेट... https://ift.tt/n1NBci7

डोंबिवली : पाच हजार रुपये डिपॉझिट परत न मिळाल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादात डॉक्टरने मेडिकल व्यवसायिकाच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याची घटना उंबर्ली रोडवरील क्लिनिकमध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात डॉ. पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव मोहम्मद हुसेन जैरुउद्दीन अन्सारी (२४) असे आहे. डॉक्टर पाटील यांच्या मालकीचा मानपाडा भागात दुकानाचा गाळा आहे. हा गाळा इंदिरा नगर येथे राहणारे मेडीकल व्यवसायिक मोहम्मद हुसेन अन्सारी व त्यांच्या मित्रांनी भाडे तत्वावर देण्याची बातचीत केली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे अन्सारी यांनी सदर गाळ्याचे डॉक्टरला ५ हजार रुपये डीपॉझिट म्हणून दिले. मात्र काही दिवसांपूर्वीच डॉक्टरने मेडीकल व्यवसायिकाला गाळा न देतात, तो गाळा दुसरा भाडेकरूला दिला. क्लिक करा आणि वाचा- यामुळे गाळ्याचे दिलेली डिपॉझिटची रक्कम परत मिळावी म्हणून अन्सारी याने डॉक्टरकडे तगादा लावला होता. मात्र, डॉक्टर पाटील हे अन्सारी याला डिपॉझिट देण्यास टाळाटाळ करीत होते. अखेर बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अन्सारी व त्याचा मित्र मानपाडा गावातील उंबार्ली रोडवर असलेल्या डॉक्टर पाटीलच्या क्लिनिकमध्ये गेले होते. त्यावेळी डॉक्टरने डीपॉझीट परत देण्यास नकार देऊन दोघांना शिवीगाळ करून वाद घातला. क्लिक करा आणि वाचा- हा वाद विकोपाला जाऊन प्रचंड रागावलेल्या डॉक्टरने क्लिनिकमध्ये असलेली लोखंडी सळई हातात घेतली आणि ती थेट अन्सारी यांच्या डोक्यात घातली. या घटनेत अन्सारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- मेडिकल व्यावसायिक मोहम्मद अन्सारी याच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात डॉक्टर पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. जोशी करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2o3dS6W

No comments:

Post a Comment