Breaking

Thursday, December 1, 2022

प्रशासनाची मोठी तारांबळ! केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राहिल्या रुग्णांच्या रांगेत उभ्या, त्यांनाही मिळाले नाही औषध https://ift.tt/O4Na6T1

: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना औषधांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असते. मात्र याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री देखील अपवाद नाही. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याच्या जिल्ह्यातच औषधाचा तुटवडा असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री () यांना आला आहे. औषधांचा तुटवड्याची परिस्थितीची पडताळणी करण्यासाठी डॉ. भारती पवार या जिल्हा रुग्णालयातील औषध घेणाऱ्या रुग्णांच्या रांगेत उभ्या राहिल्या. तेथे त्यांनी औषधांच्या उपलब्धतेची काय स्थिती आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हयात असल्यामुळे विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. आज जागतिक एड्स दिन असल्यामुळे आरोग्य विभागाकडून प्रभात फेरीचे आयोजन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. क्लिक करा आणि वाचा- या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्णांनी आम्हाला काही औषधे मिळत नाहीत, ती बाहेरुन घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार केली. तेव्हा डॉ. भारती पवार या तात्काळ औषध वाटप होत असलेल्या रुग्णांच्या रांगेत औषध घेण्यासाठी थांबल्या. त्यांचा नंबर आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले. क्लिक करा आणि वाचा- रुग्णांच्या नाव नोंदणी विभागात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी रांग लागलेली होती. ही परिस्थिती पाहून आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी वरीष्ठ आधिकाऱ्यांना बोलावून या बाबत विचारणा केली आणि त्यांची कान उघाडणी देखील केली. अचानक केंद्रीय मंत्री रुग्णांच्या रांगेत उभ्या राहिल्याने प्रशासनाची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/NJZG97X

No comments:

Post a Comment