Breaking

Sunday, December 25, 2022

उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसलेले; चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका https://ift.tt/VDPcpUk

नाशिक: भारतीय जनता पक्षाचे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या खानदेश महोत्सव या कार्यक्रमाप्रसंगी नाशिकमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून हल्लाबोल करण्यासाठी नागपूरला येत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, जेव्हा अडीच वर्षे सरकार होते तेव्हा काहीच दिवे लावले नाहीत. त्या सरकारच्या काळात कधी नागपूरला अधिवेशन झालं नाही, ज्या सरकारच्या काळात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे प्रश्न नागपूरच्या अधिवेशनात सोडवता आले नाहीत. ज्यांना विकासावर राजकारण करता येत नाही ते भावनात्मक बोलून महाराष्ट्राला संभ्रमित करण्याचे काम करतात. उद्धव ठाकरे हे नागपूरला आले, पण सभागृहात आले नाहीत. ते नागपूरला काँग्रेसच्या कार्यालयात आले. काँग्रेसच्या कार्यालयात अर्धा तास बसले. त्यामुळे संजय राऊत असो की उद्धव ठाकरे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत. त्यामुळे ते नागपुरात आल्याने काही फरक पडणार नाही. ज्यावेळी वेळ होती, नागपूरला न्याय द्यायचा होता, मुख्यमंत्री होते त्यावेळी आले नाहीत. त्यामुळे आता येऊन काही फरक पडणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. तसेच नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटात गेल्यावर त्यांनी संजय राऊत यांना सिल्व्हर ओकचे दलाल असल्याचे म्हटले होते. यावर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात... आमदारांना रेडे म्हणतात... ज्या दिवशी त्यांना तिकीट दिलं ते खरे शिवसैनिक होते धनुष्यबाण चिन्हावर लढले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होते. ज्या आमदारांना तुम्ही अठरा अठरा महिने भेटला नाहीत, ज्या आमदारांच्या पत्रांवर तुम्ही १८-१८ महिने सह्या केल्या नाहीत, जे आमदार खासदार तुम्हाला सोडून गेले, त्यांना तुम्ही रेडे म्हणता. ज्या आमदारांना पाच लाख लोकांनी निवडून दिले, त्या आमदारांचा अपमान करता. तेव्हा जनता तुमचा अपमान करेल. छोटे छोटे कार्यकर्ते तुमचा अपमान करतात, अशा शब्दात बावनकुळे यांनी घणाघाती हल्ला केला. सुब्रमण्यम स्वामींवरही साधला निशाणा या बरोबर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपुरात येऊन केलेल्या वक्तव्यात संदर्भात विचारलं असता बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन सुब्रमण्यम स्वामी यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. वाराणसीप्रमाणे कॅरिडोर करणाऱ्या पंढरपुरात येऊन सुब्रमण्यम स्वामी यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत जे वक्तव्य केलं ते माफ करण्यालायक नाही. त्यांचं वय पाहून जो आदर होता तो देखील आता निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात येऊन अशा प्रकारे यापुढे बोलू नये असा सल्ला देत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड अक्रोशात आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TCcoBbP

No comments:

Post a Comment