Breaking

Saturday, December 24, 2022

'स्वप्नांचा पाठलाग करत आहे', पत्नी अचानक समुद्रात गायब झाली, अन् मग https://ift.tt/vwR3lMf

वॉशिंग्टन: पतीसोबत सुट्टी घालवण्यासाठी गेलेली ६० वर्षीय महिला अचानक समुद्रात बेपत्ता झाली. 'टायगर शार्क'ने तिची शिकार केल्याचा दावा केला जात आहे. आता महिलेची शेवटची फेसबुक पोस्ट देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की 'ती तिच्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे आणि समुद्रात 'सर्फ' करायला शिकत आहे'. क्रिस्टीन अॅलन (वय ६०) या अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथील रहिवासी होत्या. पती ब्लेकसोबत त्या हवाई येथे सुट्टीवर गेल्या होत्या. पती ब्लेकने सांगितले की, ८ डिसेंबर रोजी ते माऊ, हवाई येथे पोहण्याचा सराव करत होत्या. दरम्यान, एक मोठा 'शार्क टायगर' मासा जवळून गेल्याचे त्यांनी पाहिले, त्यानंतर त्यांची पत्नी तेथून गायब झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की त्यांनी शार्कला काहीतरी खाताना पाहिलं. हेही वाचा - क्रिस्टीनच्या पतीनेही तिला समुद्रात शोधण्याचा प्रयत्न केला पण यश मिळाले नाही. व्यवसायाने मसाज थेरपिस्ट आणि लाइफ कोच असलेल्या क्रिस्टीनची २ डिसेंबरची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, तिला खूप दिवसांपासून समुद्रात 'सर्फ' करायला शिकायचे आहे. फोटोमध्ये ती बोर्डवर चढताना दिसत आहे. हेही वाचा - क्रिस्टीनच्या पोस्टवर तिचे मित्रही भावनिक कमेंट करत आहेत, अनेक मित्रांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली, जे त्यांना ओळखतही नव्हते. एका महिलेने कमेंटमध्ये लिहिले की, ज्या दिवशी क्रिस्टीनसोबत ही घटना घडली, त्या दिवशी ती त्याच भागात होती. त्याचवेळी, अनेकांनी लिहिले की त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला यावर त्यांचा विश्वास बसत नाही. क्रिस्टीन बेपत्ता झाल्यानंतर, यूएस कोस्ट गार्डच्या सदस्यांनी आणि माउई अग्निशमन विभागाच्या सदस्यांनी ४० तास तिला समुद्रात शोधण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. या प्रकरणात, ९ डिसेंबर रोजी, 'जमीन आणि नैसर्गिक संसाधने विभाग' च्या अधिकाऱ्यांनी, अनेक लोकांच्या विधानांच्या आधारे, क्रिस्टीनला टायगर शार्कने खाल्ल्याची पुष्टी केली. मात्र, रेस्क्यू टीममध्ये सहभागी असलेल्या टीमला क्रिस्टीनचा मृतदेह सापडला नाही. हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YxqaKHd

No comments:

Post a Comment