लखनऊ: यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये एका तरुणाने विजेचा शॉक देऊन आपल्या पत्नीची हत्या केली. हा सैतान एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या दोन मुलांसमोरच पत्नीचा मृतदेह घरात पुरला. या प्रकरणाबाबत जेव्हा तरुणाच्या आईला कळालं तेव्हा तिने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोला गोकरनाथ पोलीस ठाण्याच्या हफिजपूर परिसरातील आहे. येथे मोहम्मद वासी नावाच्या तरुणाने वस्तीत राहणाऱ्या उमा शर्मा या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न केले होते. मोहम्मद वासीने लग्नानंतर उमाचे नाव बदलून अक्षा फातिमा ठेवले होते. हेही वाचा- दोघांनाही दोन निरागस मुले आहेत. चार दिवसांपूर्वी जेव्हा मोहम्मद वासीची आई कानपूरला तिच्या मोठ्या मुलीला भेटायला गेली होती त्याच दरम्यान मोहम्मद वासी आणि अक्षा फातिमा यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. या भांडणाच्या रागातून मोहम्मद वासीने आपल्या दोन निष्पाप मुलांसमोरच पत्नी अक्षा फातिमाला विजेचा शॉक दिला. ज्यात तिचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर त्याने घरातच एका खोलीत खड्डा खणला आणि तिचा मृतदेह घरातच पुरला. दोन दिवसांपूर्वी मोहम्मद वासीने आईला फोन करून सांगितले की, त्याचे पत्नीशी भांडण झाले असून पत्नी रागाच्या भरात कुठेतरी निघून गेली आहे. यावर वासीच्या आईने कानपूरहून घरी पोहोचून मुलांकडून संपूर्ण माहिती घेतली. वासीने आईला हकीकत सांगितली की त्याने पत्नीची हत्या करून तिला घरातील खोलीतच पुरले. यानंतर वासीच्या आईने तातडीने वकिलाशी संपर्क साधला. हेही वाचा- वकिलाने आरोपीच्या आईला तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यास सांगितले. आरोपीच्या आईने गोला कोतवाली येथे जाऊन आपल्या मुलाच्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या आईला घेऊन घरातील खोलीतून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत, असं गोला एरियाचे सीओ राजेश कुमार यांनी सांगितले. गोला भागातील आशिया नावाची महिला पोलीस ठाण्यात आली. तिने सांगितले की, मुलगा मोहम्मद वासी याने तिच्या सुनेला विजेचा शॉक दिला आणि हुंड्यासाठी तिची हत्या केली आणि मृतदेह घरात पुरला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण विद्युत शॉक असल्याचं दिसतं, असंही त्यांनी सांगितलं. हेही वाचा- आरोपीला पोलिसांनी अटक केली अजून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. आरोपीच्या आईने सांगितले की, घटनेच्या वेळी मी आमच्या मुलीच्या घरी गेली होती. मुलगा आणि सून यांच्यात भांडण झाले. सुनेचे नाव अक्षा फातिमा होते. ती हिंदू मुलगी होती. लग्नापूर्वी तिचे नाव उमा शर्मा होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X5MQ7vZ
No comments:
Post a Comment