Breaking

Thursday, January 26, 2023

प्रसिद्धी डोक्यात गेली, ६ वर्षात कोट्यधीश झालेल्या युट्युबरने असा सल्ला दिला की चाहते संतापले... https://ift.tt/0xtb2yv

वॉशिंग्टन: यश मिळाल्यानंतर आपले पाय जमिनीवर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पण, प्रत्येकाला ते जमत नाही. अनेकजण यशस्वी झाल्यावर पूर्वीपेक्षा वेगळे वागायला लागतात. त्यांना त्यांच्या यशाचा अभिमान वाटायला लागतो. असंच काहीसं या युट्युबरसोबत घडलं. त्याला लहान वयात यश मिळालं, त्यामुळे तो इतरांना कमी लेखू लागला. त्याच्या या वागणुकीमुळे आता त्याचे चाहते त्याच्यावर संतापले आहेत. २४ वर्षीय युट्युबर सेबॅस्टियन ग्योर्कने एक महागडी लक्झरी कार विकत घेतली. त्यानंतर त्याने प्रत्येकाला अशीच महागडी कार खरेदी करण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे त्याचे चाहते पुरते निराश झाले. यशस्वी होण्यापूर्वी सेबॅस्टियन केएफसीमध्ये काम करत होता. त्यानंतर त्याने युट्युब आणि प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून कोट्यधीश झाला. सेबॅस्टियन हा अमेरिकेतील डेट्रॉईट येथे राहातो, त्याने फक्त ६ वर्षातच एवढी संपत्ती जमवली की आता तो कोट्यधीश झाला आणि त्याने एक लॅम्बोर्गिनी कारही खरेदी केली. त्यानंतर एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान त्यांने असे वक्तव्य केले की ज्याने त्याचे चाहते निराश झाले. प्रत्येक माणसाने लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली पाहिजे, असं तो म्हणाला. तसेच, लॅम्बोर्गिनी कार अतिशय नाममात्र दरात उपलब्ध आहे. त्यामुळे ती खरेदी करणे अवघड नाही, असंही तो म्हणाला. त्याच्या चाहत्यांना त्याची ही गोष्ट अजिबात आवडली नाही. लॅम्बोर्गिनी कारची किंमत कोटींमध्ये आहे. पण, सेबॅस्टियनने म्हणतो की ती अत्यंत स्वस्त आहे. त्यानंतर सेबॅस्टियनला ट्रोल करण्यात आलं आहे. श्रीमंत होण्यापूर्वी सेबॅस्टियन केएफसी काम करत होता. तिथे त्याला दिवसाला ७०० रुपये मिळत होते. तेव्हा तो १८-१९ वर्षांचा होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PDE9nKJ

No comments:

Post a Comment