Breaking

Wednesday, January 25, 2023

चिमुटभर कुंकवानं पांढर कपाळ हसलं..! अहमदनगरमधील महिला सरपंच प्रयगा लोंढेंचं पुढचं पाऊल https://ift.tt/Xi1Fu6m

प्रसाद शिंदे, अहमदनगर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रागतिक विचारांच्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतं. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडमध्ये गेल्या वर्षी विधवा प्रथाबंदीचा ठराव करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील गावोगावी विधवा प्रथाबंदीचे ठराव करण्यात आले. ज्या महिलांच्या पतींचं निधन झालं असेल त्यांना सन्मान देण्याची भूमिका घेतली गेली. विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला पुढं आल्या. त्यांनी रूढी परंपरांना फाटा देत विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी मोठं पाऊल उचललं. अहमदनगर शहराजवीळ शेंडी गावच्या सरपंच प्रयागा लोंढे या देखील त्यातल्याच एक प्रतिनिधी होय. अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या शेंडी या गावच्या लोकनियुक्त महिला सरपंचांनी गावातील विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटला की तो सुवासिनी महिलांचा सण परंतु या कार्यक्रमास विधवा व घटस्फोटीत महिलांना स्थान नसायचं. विधवा असल्या तरी त्या महिला आहेत त्यांनाही मन आणि भावना आहे. समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे व त्यांनाही समाजात ताठ मानेने जगता यावे या भावनेने शेंडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रयगा लोंढे यांनी आपल्या गावातील विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. जिल्ह्यातील आणि राज्यातील इतरही महिला सरपंचांनी त्यांच्या गावात अशा प्रकारचा कार्यक्रम राबवून महिलांच्या सन्मानाची भूमिका घ्यावी, असं प्रयगा लोंढे म्हणाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार करतेवेळी गावातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांशी संवाद साधतानाआपल्या गावातील या भगिनींचे दुःख जाणून घेता आलं. प्रयगा लोंढे आता सरपंच असल्या ततरी स्वतः एक महिला आहेत. आपल्या या भगिनींचे दुःख दूर व्हावे व त्यांनाही गावात तसेच समाजात ताठ मानेने जगता यावे यासाठी त्यांनी निर्धार केला होता. आपण जर सरपंच पदावर विराजमान झालो तर प्रथम गावातील विधवा घटस्फोटीत महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवू त्या अनुषंगाने त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गावातील सुमारे दीडशे महिला उपस्थित होत्या..प्रयगा लोंढे यांनी यापुढील काळात आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहेत. तसेच महिलांसाठी वेगवेगळ्या, छोटे घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी सेमिनार वगैरे घेणार आहेत, अशी माहिती दिली. यावेळी अॅड. मनीषा ढाकणे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/8FshcI0

No comments:

Post a Comment