Breaking

Sunday, January 1, 2023

दुर्दैवी! चालक नजीरची ती ट्रिप ठरली अखेरची; हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर अंगावरच उलटला https://ift.tt/BjSqIRz

: रत्नागिरीतील येथील आंग्रे पोर्टवरील हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर उलटल्याने डंपर चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रेतीने भरलेला डंपरच अंगावर पडल्याने डंपरचालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी, ३१ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता जयगड येथील आंग्रे पोर्टवर घडली अशी माहिती आज सायंकाळी उशिरा रत्नागिरी पोलिसांनी दिली आहे. नजीर लाडसाहेब मुल्ला (वय ४५) असे मृत्यू झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. नजीर हा रत्नागिरी जिल्ह्यातील कोंड येथील रहिवासी होता. या अपघाताबाबत जयगडमधील आझाद मोहल्ल्यात राहणारे आफाक इफ्तीकर संसारे (२३) यांनी जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, शनिवारी पहाटे नजीर मुल्ला आपल्या ताब्यातील डंपरमधून (एमएच-12-एनएक्स-7721) माल घेऊन आंग्रे पोर्टवरील रॉक फॉस्फेट प्लॉट येथे आला होता. त्यावेळी डंपर चुकीच्या पद्धतीने लावून त्यातील माल डम्पिंग प्लॉटमध्ये अनलोड करत असताना हायड्रॉलीक पाईप तुटून डंपर उलटल्याने त्याचा मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत. दापोली येथील सगळ्यात जुन्या डंपर व्यवसायिकाकडे गाडीवरती नजीर मुल्ला हा अनेक वर्षे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. नजीर मुल्ला हा या दुर्देवी अपघातात मृत्यूमुखी पडल्याने दापोली परिसरातही अनेकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. क्लिक करा आणि वाचा- मूळचे कर्नाटक परिसरातील असलेले हे कुटुंब गेले कित्येक वर्षे दापोलीत स्थायिक आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नजीरच्या पश्चात त्याची पत्नी, मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qFR2Yt9

No comments:

Post a Comment