Breaking

Sunday, January 1, 2023

मानवी शरीरात सापडला नवा 'अवयव', शास्त्रज्ञांनी डॉक्टरांना दिला सावधगिरी बाळगण्याचा इशारा https://ift.tt/vOT4fYx

अ‍ॅमस्टरडॅम : नेदरलँडमधील तज्ज्ञांनी मानवी चेहऱ्याच्या आत नवीन ग्रंथी शोधल्या आहेत. या ग्रंथींना शास्त्रज्ञांनी असे संबोधले आहे. या शोधाशी संबंधित संशोधन रेडिओथेरपी आणि ऑन्कोलॉजी या पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. कर्करोगाचे निदान आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात. डोके आणि मानेतील कर्करोगाच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशोधकांनी रेडिओएक्टिव्ह ग्लुकोजसह मानवी शरीराचे स्कॅनिंग केले असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. स्कॅनमध्ये चेहऱ्याच्या आत काही असामान्य दिसणाऱ्या पेशी या संशोधनात दिसल्या. १०० मृतदेहांचे स्कॅनिंग केल्यानंतर सापडला नवीन अवयव शास्त्रज्ञांनी या शोधासाठी पॉझिट्रॉन उत्सर्जन टोमोग्राफी आणि संगणित टोमोग्राफी स्कॅनचा वापर केला. या ऑन्कोलॉजिस्ट्सनी जवळपास १०० रूग्ण आणि शवांचे स्कॅनिंग केले आणि यात चेहऱ्याचे काही भाग सतत चमकत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सुरुवातीला त्यांना ही एक प्रकारची चूक असल्याचे त्यांना वाटले. परंतु पुढील तपासणीत ते मानवी शरीराच्या पूर्णपणे नवीन असलेल्या भागाबरोबर काम करत असल्याचे त्यांना दिसून आले. क्लिक करा आणि वाचा- काय आहे ट्यूबरियल ग्रंथींचे कार्य ट्यूबरियल ग्रंथी तोंडात लाळेच्या निर्मितीमध्ये भाग घेतात. नवीन अवयव साधारणपणे तीन मुख्य लाळ ग्रंथींइतकाच असतो. तथापि, ते नासोफरीनक्सच्या दोन्ही बाजूला वसलेले आहेत. कर्करोगाविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. क्लिक करा आणि वाचा- कर्करोगाच्या उपचारात घ्यावी लागेल अधिक काळजी रेडिओथेरपीमुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. मात्र, या रेडिओथेरपीमुळे नवीन शोधलेल्या लाळ ग्रंथींमध्ये गुंतागुंत होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांना चेहऱ्याच्या या नवीन भागाला लक्ष्य करणे टाळावे लागणार आहे. नासोफरीनक्समधील लाळ किंवा श्लेष्मा ग्रंथी खूप लहान असतात आणि संपूर्ण श्लेष्मल त्वचामध्ये समान रीतीने पसरलेल्या आहेत असे पूर्वी मानले जात होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/qVmrWkQ

No comments:

Post a Comment