Breaking

Friday, January 20, 2023

वरातीत बँडवर नाचत होते, अचानक कोसळले; ३१ वर्षीय समाजिक कार्यकर्त्याची चटका लावणारी एग्झिट https://ift.tt/gmnjMNF

: गेल्या काही दिवसांपासून हार्ट अटॅकमुळे अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना समोर येत आहेत. चालता-बोलता लोकांना आल्याने लोकांचा मृत्यू झालाय. सध्या उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे मित्राच्या लग्नात नाचताना एका ३१ वर्षीय व्यक्तीला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.कानपूर महानगरात विमला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष अभय सचान राहतात. ते त्यांच्या मित्राच्या लग्नासाठी रीवा येथे गेले होते. तेथे ते लग्नात गात होते आणि नाचत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. त्यानंतर अचानक ते जमिनीवर कोसळले. आसपासच्या लोकांना काही कळेल याच्यापूर्वीच श्वास थांबलेला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हेही वाचा - अभय सचान यांचा भाऊ डॉक्टर आहे. त्यांचा भाऊ अजित सचान यांनी सांगितले की अभय यांना हृदय किंवा बीपीशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. त्यांना कधी तपासाची गरजही भासली नाही. ते त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत होते. त्यांना अचानक हृदयविकाराचा धक्का कसा आला याचे कारण कळू शकलेले नाही.हेही वाचा -अभय सचान यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर तसेच कानपूरमध्ये शोककळा पसरली आहे. अभय सचान हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी सर्वप्रथम कानपूरमधील हरदोली येथे विमला नर्सिंग कॉलेज सुरू केले. त्यानंतर त्यांनी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयही उघडले. यासोबतच ते लोकांना मोफत उपचार देण्याचे काम करायचे. त्यामुळे त्यांनी कानपूर आणि आसपासच्या गावांमध्ये लोक त्यांचा खूप सन्मान करायचे.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wLkVCuj

No comments:

Post a Comment