सिंधूदुर्ग: चक्क कंटेनरमध्ये भरुन मुलामुलींची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणार्यांना हा प्रकार भलताच अंगलट आला. याठिकाणी गाडीतील मुलांनी आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना तस्करीचा संशय आला. त्यानंतर त्या ठिकाणी जमाव जमला. सर्वांनी चौकशीची मागणी केली. परंतु पोलिसांच्या चौकशीत ती एका लग्नासाठी आलेली कॅटरिंगची पोरं निघाली. त्यामुळे त्यांचे जबाब घेवून सोडून देण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.झालेला प्रकार असा की, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील मळगाव बाजारपेठेतून जाणार्या एका कंटेनरमधून आरडाओरडीचा आवाज ऐकू आला. तसेच, दरवाजा खोलो असे आतील लोक ओरडत असल्याआणि मुलं दिसून आले. मात्र, त्यातील मुलींची तोंडं बांधून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी जमलेल्या लोकांचा संशय बळावला.हेही वाचा - यावेळी त्यांनी काही राजकीय पदाधिकार्यांना त्या ठिकाणी पाचारण केले. तसेच, हा प्रकार हा तस्करीचा असल्याचे सांगून पोलिसांना त्या ठिकाणी बोलाविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यांनी झालेला प्रकाराची चौकशी करण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी गाडीसह त्या सर्वांना ताब्यात घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. त्यानुसार, सर्वांना कंटेनरसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या सर्वपक्षीय तसेच विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची चौकशी करा यात काही तरी वेगळे असल्याचा संशय आहे, असा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता तालुक्यात झालेल्या एका लग्नात जेवण वाढण्यासाठी संबधित मुलांना बोलाविण्यात आले होते. काल एका ठिकाणी एक पार्टी झाली तर आज दुसर्या ठिकाणी पार्टी असल्यामुळे ती मुले या कंटेनर मधून नेली जात होती, अशी माहीती तपासात उघड झाली.हेही वाचा -याबाबत पोलीस निरिक्षक मेंगडे यांना विचारले असता ग्रामस्थ आणि सर्वपक्षींयानी मागणी केल्याप्रमाणे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. परंतु, ती मुले ही कॅटरिंगसाठी आली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे असलेलं आधारकार्ड तसेच कालच्या पार्टीचे फोटो संबधित हॉटेलच्या मॅनेजरकडून घेण्यात आले. त्यानंतर खात्री करून त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, संबधित कंटनेर चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १ हजार रुपयाचा दंड ठोठाविण्यात आल्याचे मेंगडे म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0tcZiez
No comments:
Post a Comment