Breaking

Wednesday, January 11, 2023

घरमालकाने भाडं मागितलं; भाडेकरुचं डोकं फिरलं, घरमालकावरच हल्ला; गळ्यातील सोन्याची चैनही चोरली https://ift.tt/MjUPSyR

रत्नागिरी: थकलेले घरभाडे मागितले या रागातून तरुण भाडेकरूने वृद्ध घरमालकावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे (उगवतवाडी) येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. नुसता हल्ला करून न थांबता घरमालकाच्या गळ्यातील सोन्याची चैनही भाडेकरूने चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी आदित्य महादेव मोरे (गुढे, सध्या राहणार मार्गताम्हणे) याच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या हल्ल्यात चंद्रकांत रामजी चव्हाण (७५, मार्गताम्हणे-उगवतवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हेही वाचा - याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चंद्रकांत चव्हाण हे मार्गताम्हाणे-उगवतवाडी येथे एकटेच रहात असून त्यांच्या घरात काही भाडेकरु राहतात. त्यांच्या चौथ्या भाड्याच्या खोलीत महादेव मोरे व त्यांचा मुलगा आदित्य मोरे राहतात. महादेव मोरे यांच्याकडून चंद्रकांत चव्हाण यांना १४ हजार रुपये घरभाडे येणे बाकी आहे. महादेव मोरे हे त्याचे मुळ गाव गुढे येथे राहत असताना त्या खोलीमध्ये आदित्य हा एकटाच राहतो. दरम्यान, मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आदित्य मोरे हा चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी आला. त्यावेळी चव्हाण यांनी थकलेल्या घरभाड्याची विचारणा केली असताना याचा त्याला राग आला आणि त्याने चव्हाण यांच्या घरातील कोयत्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. ते गंभीर जखमी अवस्थेत असताना आदित्यने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीची चेन चोरुन नेली.हेही वाचा -या घटनेनंतर चव्हाण यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/T63mld0

No comments:

Post a Comment