बुलढाणा : जिल्हाधिकारी म्हटलं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा त्या पदाकडे एक उच्च पदस्थ अधिकारी म्हणून पाहत असते. जिल्हाधिकारी पदासंदर्भात सर्वसामान्यांच्या मनात एक आदराची, आकर्षणाची भावना असते. जिल्हाधिकारी म्हटलं म्हणजे फक्त आदेशाचे फर्मान सोडणे, असा विचार अनेक जण करतात.जेव्हा जिल्हाधिकारी एका सामान्य विद्यार्थ्याप्रमाणं म्हणून शाळेच्या बाकावर बसून शिक्षणाची पद्धत, परिस्थिती जाणून घेतात तेव्हा याचे कौतुक देखील होते. बुलढाणा जिल्ह्याचे देखील एका शाळेत विद्यार्थ्याप्रमाणं बसले आणि ज्ञानदानाचं कार्य व्यवस्थित पार पडतंय की नाही हे पाहिलं.जिल्हाधिकारी बनले सातवीच्या वर्गाचे विद्यार्थी!बुलढाणा शहरातील अनुदानित खासगी शाळेत शिक्षणाचा दर्जा तपासणी साठी गेलेले जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड हे चक्क सातवीच्या वर्गातील विद्यार्थी बनले. एच.पी. तुम्मोड हे वर्गात गणिताची शिकवणी सुरु असताना विद्यार्थ्यांप्रमाणं बेंचवर बसले होते.बुलढाणा शहरातील एडेड हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी डॉ.एच. पी तुम्मोड यांच्यासोबत उपजिल्हाधिकरी गौरी सावंत, उपविभागीय अधिकारी हांडे यांनी भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी यांनी इयत्ता सातवीच्या वर्गात बसून वर्गात चालू असलेल्या गणित विषयाच्या उजळणीमध्ये सहभाग घेत तासिका निरीक्षण केले. ज्येष्ठ शिक्षिका जावरकर यांच्याकडून गणिताचं अध्यापन सुरु होतं. तासिका संपल्यानंतर यावेळी जिल्हाधिकारी यांनी एडेड शाळेच्या प्रगतीचे व इतिहासाची माहिती घेतली. शाळेचे विविध पर्यावरणीय उपक्रम, शाळेतील विविध खेळ तसेच विद्यार्थी यशस्वीता यावर अगदी मनमोकळेपणे विचारणा केली. इमारत आणि परिसराचे कौतुक केले. आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षक कमतरतेवर पण चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. यावेळी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती मुख्याध्यापक किंबहुने यांनी दिली . रिसर व इतर माहिती वनश्री पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षक आर. एन. जाधव यांनी दिली. यावेळी पर्यवेक्षिका निकाळजे व सहायक शिक्षक अयाचित उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक किंबहुने यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले. एडेड महाविद्यालयात जिल्हाधिकारी यांनी निरीक्षण करून शैक्षणिक कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ.एच. पी. तुम्मोड यांनी दिलेल्या भेटीनंतर शाळेचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ysRz2Po
No comments:
Post a Comment