Breaking

Monday, January 2, 2023

होय दोघे नशेत होतो, ती कारला अडकलेली, दिल्लीतील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी आरोपींची कबुली https://ift.tt/mMiH7qT

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सुल्तानपुरीमधील कंझावला भागात एका तरुणीच्या मृत्यूमुळं खळबळ उडाली होती. तरुणीच्या मृत्यूमुळं दिल्ली हादरली होती. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली होती. त्यापैकी दोन आरोपींनी नशेत असल्याचं मान्य केलं आहे. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपींना स्कुटीला धडक दिली असल्याचं देखील माहिती होतं, असं एफआयरमध्ये सांगण्यात आलं आहे. आरोपींपैकी अमित आणि दीपक या दोघांनी दुर्घटना घडली त्यावेळी ते दारुच्या नशेत असल्याचं मान्य केलं आहे. दिल्लीच्या कृष्णविहार भागात स्कुटीवरील मुलीचा धडक दिल्यांचं त्यांना माहिती होतं. यानंतर घाबरून कंझावलाकडे गेलो असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. दीपक यानं तो कार चालवत होता हे मान्य केलं आहे. अपघाताची आरोपींना माहिती आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्ण विहारमध्ये शनी बाजार रोडवर स्कुटीवरील मुलीला धडक दिली होती. त्यानंतर ती खाली कोसळली होती. भीतीपोटी आम्ही कंझावला कडे गेलो होतो, असं आरोपींनी पोलिसांना संगितलं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दिल्ली हादरली नवी दिल्लीतील सुल्तानपुरी कंझावला भागात एका तरुणीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली होती. एका कारनं फरफटत नेल्यानं तिचा मृत्यू झाला होता. तरुणीला १० ते १२ किमी फरफटत नेण्यात आलं. एका वळणावर गाडी वळल्यानं तिचा मृतदेह कारपासून वेगळा झाला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. नेमकं प्रकरण काय? दिल्लीतील कंझावला भागात रविवारी एका युवतीचा अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. मतृदेहाची अवस्था देखील संवेदनशील व्यक्ती पाहू शकणार नाही, अशी होती. कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कारनं तरुणीच्या स्कुटीला धडक दिली. यानंतर तिला १० ते १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं त्यामुळं तिचा मृत्यू झाला होता. स्कुटीच्या नंबरवरुन तरुणीची माहिती काढण्यात आली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BzEOFXH

No comments:

Post a Comment