Breaking

Saturday, January 21, 2023

कुणावरही अशी वेळ येऊ नये; एकाच सरणावर मुलगी-जावई अन् दोन नातवांना मुखाग्नी दिला, गुहागर हळहळलं... https://ift.tt/P5Ej8yY

रत्नागिरी/गुहागर: कोकणात गुहागर तालुक्यातल्या हेदवी येथे आजीच्या वर्षश्राध्दाला येत असताना मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव रोपोली येथे झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला होता. यात पंडित कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन लहानग्यांचा समावेश होता. या चौघांनाही एकाच सरणावरती अग्नी देण्याची वेळ हेदवी येथील रघुनाथ सखाराम जाधव यांच्या कुटुंबावर आली. यावेळी जाधव कुटुंबासह उपस्थितांनी फोडलेला हंबरडा हा हृदय पिळुन टाकणारा होता. या अपघातात रघुनाथ जाधव यांची मुलगी, जावई आणि दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. तर, एका सरणावर त्यांना त्यांच्या मुलाला अग्नी द्यावा लागला. शेवंती सखाराम जाधव या १०३ वर्षांच्या आजी यांचा गेल्यावर्षी मृत्यू झाला होता, त्या आजीच्या वर्षश्राद्धला सगळे येत होते.हेदवी जुवेवाडी येथील मनोहर जाधव यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने गुरुवारी रात्री उशिरा मुंबई येथून जाधव आणि पंडित कुटुंबीय निघाले होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात या पाच जणांना मृत्यूने गाठले. यामध्ये नीलेश पंडित (वय ४५), त्यांची पत्नी नंदिनी (वय ३५), मुलगी मुद्रा (वय १२) आणि मुलगा भव्य (वय ४) यांचा मृत्यू झाला होता. नीलेश पंडित हे हेदवी गावचे जावई असून, भादगाव जवळ डावखोल (तालुका गुहागर) हे त्यांचे मूळ गाव आहे. गावात घरचे कोणी नसल्याने त्यांच्यावरही हेदवी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.स्मशानभूमीत दोनच शवदाहिन्या असल्याने या चौघांनाही एकाच सरणावर ठेवून शेवटचा निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठी चिता रचून नीलेश, नंदिनी, मुद्रा आणि भव्य या पंडित कुटुंबातील चौघांना एकाच सरणावर अग्नी देण्यात आला. मुलगी, जावई आणि दोन लहानग्या नातवांना अग्नी देण्याची वेळ रघुनाथ जाधव यांच्यावर आली. यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग अजून किती जणांचा बळी घेणार आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RbLsZYI

No comments:

Post a Comment