म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः म्हाडाकडून मार्चमध्ये ४ हजार घरांची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत अत्यल्प (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) २,६८३ घरे आहेत.म्हाडातर्फे गोरेगाव पश्चिमेतील पहाडी गोरेगाव भागात घरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. गोरेगाव पहाडीप्रमाणेच विक्रोळीतील कन्नमवारनगर, वडाळ्यासह अन्यत्र विखुरलेल्या भागात ही चार हजार घरे आहेत. २३ मजली सात इमारती असून, त्यात अत्यल्प, अल्प गटातील घरांचा समावेश आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीत पहाडी गोरेगाव येथील २३ मजली सात इमारतींमध्ये अल्पल्प गटासाठी १,२३९ घरे उपलब्ध आहेत. त्या घरांचे क्षेत्रफळ ३२२.६० चौ. फूट एवढे आहे. त्या घरांची अंदाजित किंमत ३५ लाख रुपये एवढी आहे. त्याचप्रमाणे उन्नतनगर क्रमांक दोन येथील प्रेमनगर येथे अत्यल्प गटासाठी ७०८ घरे असून, त्यांचे क्षेत्रफळ ४८२.९८ चौ. फूट आहे. त्या घरांची अंदाजित किंमत ४५ लाख रुपये आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (एमआयजी) २२७ घरे असून, त्यांचे क्षेत्रफळ ७९४.३१ चौ. फूट एवढे आहे. उच्च उत्पन्न गटासाठी (एचआयजी) १०५ घरे असून त्यांचे क्षेत्रफळ ९७८.५८ चौ. फूट असून, सोडतीसाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. म्हाडाने उच्च उत्पन्न गट (एचआयजी), मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) वर्गात प्रथमच खासगी विकासकांना स्पर्धात्मक सुविधा देण्याचा चंग बांधला आहे. या इमारतीत क्लब हाऊससह जलतरण तलावाचीही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यातील अनुक्रमे २ बीएचके आणि ३ बीएचके घरांसाठी ही सुविधा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/gHtUCYL
No comments:
Post a Comment