हैदराबाद: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून शुभमन गिलने द्विशतक झळकावले असले तरी त्याच्या सोबत आणखी एका खेळाडूचे कौतुक होत आहे. तो म्हणजे न्यूझीलंडचा होय. भारताने दिलेल्या ३५० धावांचे आव्हानाचा पाठलाग करतान न्यूझीलंडची अवस्था ६ बाद १३१ अशी झाली होती. पण जेव्हा सामना ५०व्या षटकात पोहोचला तेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी ६ चेंडूत २० धावांची गरज होती. ज्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव कधीच झाला पाहिजे होता तेथे न्यूझीलंडने लढत अखेरच्या षटकापर्यंत आणली होती. मायकेल ब्रेसवेलने मिचेल सँटनरसोबत सातव्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागिदारी केली. या दोघांनी वनडे क्रिकेटमधील सातव्या क्रमांकासाठीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागिदारी केली. या दोघांनी १६२ धावा केल्या. भारताविरुद्धची ही कोणत्याही देशाने केलेली सातव्या क्रमांकासाठीची सर्वोच्च भागिदारी ठरली. याआधीचा विक्रम बांगलादेशच्या खेळाडूंना नावावर होता, त्यांनी २०२२ मध्ये १४८ धावांची भागिदारी केली होती.वाचा- न्यूझीलंडचा पराभव जरी झाला असला तरी मायकेल ब्रेसवेलने या सामन्यात सर्वांचे मन जिंकले. त्याने ७८ चेंडूत १० षटकार आणि १२ चौकारांसह १४० धावा केल्या. या खेळीत अनेक विक्रमांची देखील नोंद झाली. भारताविरुद्ध सातव्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूने केलेली ही चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी आहे. मायकेल ब्रेसवेलने या धमाकेदार शतकी खेळीत एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. वनडे क्रिकेटच्या इतिहासात याआधी फक्त एकाच फलंदाजाने सात किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर येत दोन वेळा शतकी खेळी केली आहे. हा एकमेव खेळाडू म्हणजे महेंद्र सिंह धोनी होय. आजच्या मॅचमध्ये मायकेल ब्रेसवेलने झळकावलेले त्याच्या करिअरमधील दुसरे शतक होते. या शतकासह त्याने धोनीच्या यादीत स्थान मिळवले.वाचा- ... वनडे क्रिकेटमध्ये सात किंवा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक करणारे फक्त दोनच फलंदाज आहेत. पहिला धोनी आणि आता ब्रेसवेल होय. मायकेल ब्रेसवेलने याआधी १० जुलै २०२२ रोजी आयर्लंडविरुद्ध सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक केले होते. न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक करणाऱ्यांच्या यादीत मायकेल ब्रेसवेल तिसऱ्या क्रमांकवर आला आहे. त्याने ५७ चेंडूत १०० धावा केल्या. या यादीत कोरी अँडरसन अव्वल स्थानी असून त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २०१४ साली ३६ चेंडूत शतक केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jlo453t
No comments:
Post a Comment