मुंबई: टीम इंडियाचा एक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी सध्या सर्वात मोठा धोका बनला आहे. हा गोलंदाज आता कर्णधार रोहित शर्माच्या अधिक विश्वासार्ह आणि जवळचा झाला आहे. कर्णधार रोहित शर्माचा हा सर्वात विश्वासार्ह वेगवान गोलंदाज जेव्हा मैदानावर उतरतो तेव्हा फलंदाज थरथर कापतात, असं म्हणतात. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर खूप खूश आहेत. त्यामुळे आता सिराज हा येत्या २०२३ वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे.हेही वाचा -न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माने आपला सर्वात विश्वासू आणि जवळचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे भरभरुन कौतुक केले आहे. पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, 'मोहम्मद सिराजने गेल्या दोन वर्षांत सर्व फॉरमॅटमध्ये बरीच सुधारणा केली आहे. तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे.'हेही वाचा -तो त्याच्या गोलंदाजीला आता अधिक चांगल्या पद्धतीने समजतो, ही माझ्या मते एक मोठी गोष्ट आहे. संघाला त्याच्याकडून काय हवे आहे हेही त्याला माहीत आहे. एकूणच तो आमच्यासाठी खूप फायदेशीर गोलंदाज ठरु शकतो. न्यूझीलंड भारतापुढे मोठं आव्हान उभे करेल. ही एक उत्तम संधी आहे आणि न्यूझीलंड एक उत्तम विरोधी संघ आहे, असंही रोहित म्हणाला.हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yGjtmNg
No comments:
Post a Comment