Breaking

Tuesday, January 17, 2023

रोहितचं कर्णधारपद जाताच या खेळाडूचं क्रिकेट करिअरही संपुष्टात येणार?, खराब फॉर्म ठरणार कारण... https://ift.tt/izXTcd3

मुंबई: रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे आता अवघे काही दिवस उरले आहेत. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भारतात होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर रोहित शर्माचा कर्णधारपदाचा प्रवास संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. ३५ वर्षीय रोहित शर्मानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या किंवा श्रेयस अय्यर यापैकी एकजण भारताचा नवा एकदिवसीय कर्णधार होऊ शकतो. रोहित शर्माचे कर्णधारपद संपुष्टात आल्याने मात्र या एका खेळाडूचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे सुरेश रैनाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरचा अंत झाला होता. आता रोहित शर्माने कर्णधारपद सोडले तर पुन्हा असंच काहीसं घडू शकते. जर रोहित शर्मा २०२३ एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकला नाही, तर त्याचे एकदिवसीय कर्णधारपद हिरावून घेतले जाऊ शकते. रोहित शर्माचे कर्णधारपद गेल्यानंतर टीम इंडियाच्या या खेळाडूचे करिअर कदाचित संपुष्टात येऊ शकते.हेही वाचा -रोहित शर्माने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये केएल राहुलला जितक्या संधी दिल्या आहेत तितक्या क्वचितच इतर कोणत्या खेळाडूला मिळाल्या असतील. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करुनही केएल राहुलला कर्णधार रोहित शर्माने अनेक संधी दिल्या. जेव्हा आपल्या खराब खेळीमुळे केएल सलामीवीर हे स्थान वाचवू शकला नाही तेव्हा रोहितने त्याला ५ व्या स्थानावर फलंदाजी करायला पाठवलं. इतकंच नाही तर राहुल द्रविडनेही केएल राहुलचं खूप कौतुक केलं होतं. हेही वाचा -केएल राहुलची कामगिरी गेल्या वर्षभरापासून सातत्याने घसरत आहे. तरीही त्याचं टीम इंडियातील स्थान अजूनही कायम आहे. २०२२ च्या टी-२० विश्वचषकातही केएल राहुल पूर्णपणे अपयशी ठरला. केएल राहुलने २०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने ४, ९, ९, ५०, ५१ आणि ५ धावा केल्या होत्या. जर तो २०२३ एकदिवसीय विश्वचषकातही फ्लॉप ठरला तर टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होऊ शकतात.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/M5ZPKoJ

No comments:

Post a Comment